शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

अमेरिकेत शीख कुटुंबातील चौघांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 3:14 AM

गोळीबाराच्या दोन घटनांमुळे दहशत : मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश

वॉशिंग्टन : अमेरिकेत एका शीख कुटुंबातील चार सदस्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली, असे वेस्ट चेस्टर पोलीस प्रमुख जोएल हजोंग यांनी सांगितले. ‘माझी पत्नी आणि कुटुंबातील अन्य तीन सदस्य जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. त्यांच्या डोक्यातून रक्त ओघळत आहे. कुणीही बोलत नाही. काही हालचाल करीत नाही, असे या इसमाने ९११ या क्रमांकावर फोन करून पोलिसांना सांगितले.हकीकत सिंग पनाग (५९), त्यांची पत्नी परमजित कौर (६२), कन्या शालिंदर कौर (३९) आणि एक नातेवाईक अमरजित कौर (५८), अशी मृतांची नावे आहेत. या सर्वांची रविवारी रात्री अंदाजे ९.५० च्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे, असे पोलीस अहवालात म्हटले आहे. या चौघांची हत्याच करण्यात आली.

सर्व जण गोळी लागल्याने मरण पावले आहेत, असे शवविच्छेदन करणाºया एका अधिकाºयाने सांगितले. हत्याकांड घडले त्यावेळी कुटुंबातील कुणीतरी स्वयंपाक करीत असावा. कारण पोलीस जेव्हा वेस्ट चेस्टर अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या लेकफ्रंटमध्ये पोहोचले तेव्हा तेथे शेगडीवर एक डिश ठेवलेली होती. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी पोलिसांच्या संपर्कात आहेत. आरोपीला लवकरच बेड्या ठोकण्यात येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, नवी दिल्ली येथे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी टिष्ट्वट करून या हत्याकांडाची माहिती दिली.

गोळीबारात दोन विद्यार्थी ठारअमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना विद्यापीठात मंगळवारी एका पिस्तूलधारी इसमाने केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थी ठार आणि चार जण जखमी झाले. विद्यापीठाच्या शेवटच्या दिवशी ही घटना घडली. हल्लेखोर हातात पिस्तूल घेऊन सरळ वर्गात घुसला आणि तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांवर त्याने गोळीबार केला. हल्लेखोराला पोलिसांनी जिवंत पकडले आहे.

या घटनेनंतर कॅरोलिना-चॅर्लोट विद्यापीठ बंद करण्यात आले आहे. गोळीबार होताच विद्यार्थ्यांनी सैरावैरा पळत जाऊन सुरक्षित स्थळ गाठले. ‘मोठा आवाज झाला. चार-पाच फैरी झाडल्याचा आवाज. प्रत्येक विद्यार्थी वाट मिळेल तिकडे पळताना मी पाहिले. सर्वच घाबरलेले होते,’असे आपल्या मित्राच्या कला दालनाला भेट देण्यासाठी आलेला २४ वर्षीय अँटोनियो रॉड्रीग्ज याने सांगितले.

कॅम्पस पोलीस प्रमुख जेफ बेकर म्हणाले, ‘एका पिस्तूलधारी हल्लेखोराने अनेक विद्यार्थ्यांना ठार मारले आहे, अशी माहिती देणारा फोन कॉल दुपारी आम्हाला प्राप्त झाला. त्यानंतर पोलीस अधिकारी तात्काळ विद्यापीठाच्या क्लासरूममध्ये दाखल झाले आणि हल्लेखोराला अटक केली. आमचे अधिकारी वेळीच पोहोचल्याने अनेकांचा जीव वाचला. पण तोपर्यंत दोन विद्यार्थी प्राणास मुकले होते. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. एक जण किरकोळ जखमी झाला आहे.’ ट्रिस्टन अँड्र्यू टेरेल (२२) असे हल्लेखोराचे नाव आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाFiringगोळीबार