Pakistan Pervez Musharraf passes away: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन, दुबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 11:46 AM2023-02-05T11:46:36+5:302023-02-05T11:59:58+5:30

मुशर्रफ दीर्घकाळ आजारी होते.

Former President of Pakistan General Pervez Musharraf passes away after a prolonged illness at Dubai hospital | Pakistan Pervez Musharraf passes away: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन, दुबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास

Pakistan Pervez Musharraf passes away: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन, दुबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास

googlenewsNext

Pakistan Pervez Musharraf passes away: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे आज (रविवारी) निधन झाले. पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. मुशर्रफ हे अनेक दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुशर्रफ अमायलोइडोसिस या आजाराने त्रस्त होते. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, परवेझ मुशर्रफ यांचा शेवटचा व्हिडीओ समोर आला होता त्यात त्यांना चालताही येत नसल्याचे दिसून आले. ते पूर्णपणे व्हीलचेअरवर होते.

परवेझ मुशर्रफ यांचा जन्म दिल्लीतील

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज भागात झाला होता. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या काही दिवस आधी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील पाकिस्तान सरकारमध्ये काम करत होते.

टर्की मध्ये जीवन

यानंतर त्यांच्या वडिलांची पाकिस्तानातून तुर्कीला बदली झाली. १९४९ मध्ये ते तुर्कीला गेले. काही काळ ते आपल्या कुटुंबासह तुर्कीमध्ये राहत होता. त्यांनी तुर्की भाषा देखील शिकली. मुशर्रफ हे तरुणपणी क्रीडापटू होते. १९५७ मध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब पुन्हा पाकिस्तानात परतले. त्यांचे शालेय शिक्षण कराचीच्या सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये झाले आणि कॉलेजचे शिक्षण लाहोरच्या फोरमन ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले होते.

Web Title: Former President of Pakistan General Pervez Musharraf passes away after a prolonged illness at Dubai hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.