लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 09:48 IST2025-11-20T09:43:14+5:302025-11-20T09:48:32+5:30
Pakistan confession Delhi Blast: पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांचा व्हिडीओ

लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
Pakistan confession Delhi Blast: दिल्लीच्या लाल किल्ल्यावर १० नोव्हेंबरला संध्याकाळी ६:५२ वाजता i20 कारमध्ये मोठा स्फोट झाला. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. एनआयएने हा आत्मघातकी हल्ला असल्याचे वर्णन केले आहे. डॉ. उमर या याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या फॉरेन्सिक तपासात स्फोटाचेकारण अमोनियम नायट्रेट इंधन तेल (एएनएफओ) आणि इतर उच्च-स्फोटक पदार्थ असल्याचे आढळून आले आहे. या मॉड्यूलमध्ये सहभागी असलेल्या सर्व संशयितांना पकडण्यासाठी सुरक्षा संस्था काम करत आहेत.
पाकिस्तानी नेत्याची कबुली
दिल्ली कार बॉम्बस्फोटाच्या आठ दिवसांनंतर, एका पाकिस्तानी नेत्याने या हल्ल्यात त्यांच्या देशाचा सहभाग असल्याचे कबूल केले आहे. पाकव्याप्त काश्मीर (PoK) चे माजी पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी पीओके असेंब्लीला सांगितले की, मी आधीच सांगितले आहे की जर तुम्ही (भारत) बलुचिस्तानमध्ये रक्तपात करत राहिलात तर आम्ही लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या खोऱ्यापर्यंत भारतावर हल्ला करू. आमच्या शाहीनने तेच केले. तिने घुसून हत्या केल्या आणि त्यांचे मृतदेह अद्याप मोजले गेलेले नाहीत."
POJK PM praised Delhi blast ⚠️
— War & Gore (@Goreunit) November 19, 2025
Yesterday POJK's recently resigned PM Anwarul Haq said that “I earlier said that if you keep bleeding Balochistan, we'll hit India from Red Fort to the forests of Kashmir and we've done it, they're still unable to count bodies." pic.twitter.com/vK6fDVr4cb
दोन दिवसांपूर्वी अविश्वास प्रस्तावाद्वारे अन्वरुल हक यांना पंतप्रधानपदावरून काढून टाकण्यात आले. पाकिस्तानने या विधानावर अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की भारतासोबत युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भारताने बलुचिस्तानमधील हिंसाचारात कोणताही सहभाग असल्याचे सातत्याने नाकारला आहे.