अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 विमानाचा माजी वैमानिक निघाला चीनचा गुप्तहेर, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:57 IST2026-02-26T17:56:32+5:302026-02-26T17:57:20+5:30

F-35 Plane News: अमेरिकेच्या न्याय विभागाने अमेरिकन हवाई दलाच्या एका निवृत्त वैमानिकाला अटक केली आहे. चिनी हवाई दल आणि चिनी वैमानिकांना लढाऊ विमानांबाबतचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

Former pilot of America's cutting-edge F-35 aircraft turns out to be a Chinese spy, shocking information comes to light during interrogation | अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 विमानाचा माजी वैमानिक निघाला चीनचा गुप्तहेर, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 विमानाचा माजी वैमानिक निघाला चीनचा गुप्तहेर, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

अमेरिकेच्या न्याय विभागाने अमेरिकन हवाई दलाच्या एका निवृत्त वैमानिकाला अटक केली आहे. चिनी हवाई दल आणि चिनी वैमानिकांना लढाऊ विमानांबाबतचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कुठलीही परवानगी किंवा माहिती न देता त्याने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे.

याबाबत समोर आलेल्या वृत्तानुसार या माजी वैमानिकाची ओळख गेराल्ड ब्राऊन अशी पटलली आहे. त्याचं वय ६५ वर्षे एवढं असून, त्याला इंडियाना राज्यातून अटक करण्यात आली आहे. न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार सदर माजी वैमानिक हा डिसेंबर २०२३ पासून चीनमध्ये राहत होता. तो हल्लीच अमेरिकेत पोहोचला होता. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ब्राऊन याने आपल्या कामाबाबत कुणालाही माहिती दिली नव्हती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बरोबरच ब्राऊन याच्याकडे परराष्ट्र विभागाकडून देण्यात येणारा आवश्य परवानाही नव्हता. ब्राऊन याने परदेशी नागरिकांसोबत मिळून तिनी हवाई दलाच्या वैमानिकांना कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट ट्रेनिंग देण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियमांनुसार अमेरिकन सैन्य तंत्र किंवा प्रशिक्षण परदेशात द्यायचं असेल, तर त्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागते.

दरम्यान, ब्राऊन याने अमेरिकन हवाई दलामध्ये २४ वर्षे सेवा दिली होती. या दरम्यान, त्याने अण्वस्त्रे वाहून नेणाऱ्या युनिट्समध्ये काम केले होते. तसेच अनेक कॉम्बॅक्ट मोहिमांमध्ये नेतृत्वही केलं होतं.   

Web Title: Former pilot of America's cutting-edge F-35 aircraft turns out to be a Chinese spy, shocking information comes to light during interrogation