पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 17:59 IST2019-06-10T17:59:33+5:302019-06-10T17:59:50+5:30
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना अटक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असलेले झरदारी यांच्यावर खोटी बँक खाती उघडल्याचा आरोप ठेवून एनएबीने ही अटकेची कारवाई केली आहे. यासंदर्भातील वृत्त पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले आहे.
आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पती असून, २००८ ते २०१३ या काळात त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपतीपद भूषवले होते.
Pak Media: NAB has arrested former Pakistan President Asif Ali Zardari in fake bank accounts case. (File pic) pic.twitter.com/zwI5Ci0sf3
— ANI (@ANI) June 10, 2019