पेट्रोल पंपावर विसरला बायको

By Admin | Updated: January 20, 2016 03:21 IST2016-01-20T03:21:55+5:302016-01-20T03:21:55+5:30

पेट्रोल पंपावर तो बायको, मुलांसह गेला. पेट्रोल भरले...आणि कार सुरू करून तो सुसाट निघाला. बायको कारबाहेर राहिल्याचे त्याच्या लक्षातच आले नाही

Forgotten wife on petrol pump | पेट्रोल पंपावर विसरला बायको

पेट्रोल पंपावर विसरला बायको

रियो दी जनेरो : पेट्रोल पंपावर तो बायको, मुलांसह गेला. पेट्रोल भरले...आणि कार सुरू करून तो सुसाट निघाला. बायको कारबाहेर राहिल्याचे त्याच्या लक्षातच आले नाही. तब्बल तासाभरानंतर हा प्रकार लक्षात आला आणि त्याच्या पत्नीने पोलिसांशी संपर्क केल्यानंतर हा सर्व उलगडा झाला.
त्याचे झाले असे की, अर्जेंटिनातील वॉल्टर हे पत्नी क्लोडिया आणि १४ वर्षीय मुलासह सुटीनिमित्त ब्राझीलमध्ये आले होते. परतीच्या प्रवासात त्यांचा मुलगा पुढील सीटवर बसला होता, तर पत्नी मागील सीटवर झोपलेली होती. पेट्रोल पंपावर कार थांबल्यानंतर पत्नी बिस्किट आणण्यासाठी खाली उतरली. याच वेळात पेट्रोल भरून झाल्यानंतर वॉल्टर यांनी कार सुरू केली आणि ते भरधाव निघाले. मुलगा पुढील सीटवर मोबाईल खेळण्यात दंंग होता. क्लोडिया पतीला फोन करण्याचा प्रयत्न करीत होती; पण रेंज नसल्याने मोबाईलवरून संपर्क होत नव्हता. अखेरीस तिने पोलिसांशी संपर्क केला. व पोलिसांसह ती पुढील पोलीस ठाण्यात गेली तेव्हा तिचा पती तेथे आला. क्लोडिया ही पतीवर खूपच रागवली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Forgotten wife on petrol pump