शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

मोबाइल फोन विसरा, येणार स्मार्ट चष्मा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 05:12 IST

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले की, मोबाइल तंत्रज्ञान हे आता जुने झाले आहे. पुढील काही वर्षांत मोबाइलची जागा स्मार्ट चष्मा घेणार आहे. मेटा आणि ॲपलसारख्या कंपन्या हे तंत्रज्ञान आणण्यात गुंतल्या आहेत. 

कॅलिफोर्निया : लोक मोबाइलशिवाय काही क्षणही राहू शकत नाहीत अशी आजची स्थिती आहे. फोन बंद झाला तर लोक अगदी बैचेन होतात. मात्र जर भविष्यात फोनच बंद झाला तर? हा विचारच आपण करू शकत नाही. पण हे शक्य होणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक जुन्या उपकरणाच्या जागी नवीन उपकरण येत आहे. असेच काहीसे स्मार्टफोनच्या बाबतीत होणार आहे.मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले की, मोबाइल तंत्रज्ञान हे आता जुने झाले आहे. पुढील काही वर्षांत मोबाइलची जागा स्मार्ट चष्मा घेणार आहे. मेटा आणि ॲपलसारख्या कंपन्या हे तंत्रज्ञान आणण्यात गुंतल्या आहेत. 

चष्म्यानेच होणार बहुतेक कामेभविष्यात लोक मोबाइल फोन फक्त अगदी काही  कामांसाठी वापरतील, असे झुकरबर्ग म्हणाले.ते त्यांच्या चष्म्यानेच बहुतेक काम करतील. रे-बॅनसह मेटा असे चष्मे बनविण्यात व्यस्त आहे. सॅमसंग आणि गुगलसारख्या कंपन्यादेखील एआय फीचर्स असलेले स्मार्ट ग्लासेस लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

फक्त बोला अन्तुमच्या हातांना आराम द्यास्मार्ट चष्मे प्रगत तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल वैशिष्ट्यांसह अनेक सुविधा प्रदान करतील. त्यांचा डिस्प्ले केवळ सूचनाच नाही तर नेव्हिगेशन आणि इतर माहितीदेखील दर्शवेल.वापरकर्त्यांच्या हाताचा वापर न करता केवळ व्हॉइसद्वारे संदेश पाठवण्याची आणि कॉल करण्याची सुविधा तुम्हाला मिळेल. यामध्ये इनबिल्ट स्पीकर्स असतील, जे ऑडिओ सूचना देतील.

संवाद आणि कनेक्टिव्हिटीचा नवीन आयाममेटा यावर्षी रे-बॅनच्या मदतीने स्मार्ट चष्मा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये एक डिस्प्ले जोडला जाईल, जो यूजर्सना नोटिफिकेशन्स दाखवू शकेल. झुकेरबर्ग म्हणाले की, यामुळे डिजिटल गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल. हा संवाद आणि कनेक्टिव्हिटीचा नवा आयाम असेल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गMetaमेटा