"देशातून चालते व्हा, नाहीतर..."; अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी व्यक्तींसाठी नवीन नियम लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:59 IST2025-04-13T16:58:39+5:302025-04-13T16:59:22+5:30

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांविरोधात मोहीम हाती घेत कठोर पाऊले उचलली आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून ट्रम्प सरकारने हा नवीन नियम लागू केला आहे.

Foreign nationals who stay in the US longer than 30 days must register with the government and a failure to comply can lead to fines - US Donald Trump Govt | "देशातून चालते व्हा, नाहीतर..."; अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी व्यक्तींसाठी नवीन नियम लागू

"देशातून चालते व्हा, नाहीतर..."; अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी व्यक्तींसाठी नवीन नियम लागू

अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं नवा नियम लागू केला आहे. अमेरिकेत यापुढे ३० दिवसांहून जास्त राहणाऱ्या परदेशी नागरिकांना स्वत:हून रजिस्टर करावे लागेल. जर त्यांनी हे केले नाही तर त्यांच्यावर दंड लावला जाईल. त्याशिवाय जेलमध्येही जावे लागू शकते. तसेच या लोकांना त्यांच्या देशात डिपोर्ट करण्याची कारवाईही अमेरिका करेल. 

होमलँड सिक्युरिटी विभागाने हा नवीन आदेश जारी केला आहे. ज्यानुसार, ३० दिवसांहून अधिक काळ अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना फेडरल गवर्नमेंट अंतर्गत स्वत:ची नोंदणी करावी लागेल. त्यांनी या नियमांचे पालन केले नाही तर तो गुन्हा ठरेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांविरोधात मोहीम हाती घेत कठोर पाऊले उचलली आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून ट्रम्प सरकारने हा नवीन नियम लागू केला आहे.

'स्वतःहून हद्दपार न झाल्यास १,००० ते ५,००० डॉलरपर्यंत दंड आकारला जाईल'

अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्यांनी स्वत:हून देशातून हद्दपार व्हावे अथवा नोंदणी करावी. अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांना टॅग करून होमलँड सिक्युरिटीने एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिलंय की, जर एखाद्याला अंतिम हद्दपारीचा आदेश मिळाला आणि त्यानंतरही त्याने अमेरिका सोडली नाही तर त्याला प्रतिदिन ९९८ डॉलरपर्यंत दंड भरावा लागू शकतो. अमेरिकेतून स्वत:ला डिपोर्ट करू न शकणाऱ्यांना १ हजार ते ५ हजार इतका दंड आणि काही काळ जेलची हवाही खावी लागू शकते.

H-1 व्हिसा आणि विद्यार्थी परमिटवर काय होणार परिणाम?

ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय थेट अशा लोकांवर परिणामकारक ठरणार नाही जे H-1B अथवा विद्यार्थी परमिट घेऊन अमेरिकेत राहत आहेत. त्याशिवाय इतर परदेशी लोकांना हा नियम लागू असेल. H1-B व्हिसा हा एखादा नोकरी गमावतो, त्यानंतर ठराविक वेळेत देशाबाहेर जात नाही तर त्यावर कारवाई होऊ शकते. नव्या नियमामुळे आता विद्यार्थी आणि H-1B व्हिसा धारकांना मुदतीत त्यांची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करावी लागेल. स्वत: निर्वासित होणाऱ्यांना कुठल्याही विमानाने त्यांच्या देशात जाता येईल. त्याशिवाय स्व-निर्वासन भविष्यात कायदेशीर स्थलांतरासाठी संधी उघडेल असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: Foreign nationals who stay in the US longer than 30 days must register with the government and a failure to comply can lead to fines - US Donald Trump Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.