पाकिस्तानमधील 500 हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 13:11 IST2018-03-28T13:09:25+5:302018-03-28T13:11:06+5:30

पाकिस्तानमधील सिंध प्रांतात असलेल्या मातली जिल्ह्यातील जवळपास 500 हिंदूंचे जबरदस्तीने  मुस्लिमांमध्ये धर्मांतर केले आहे. गेल्या 25 मार्चला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पार्टीच्या पदाधिका-यांनी हिंदूंचे धर्मांतर जबरदस्तीने करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

Forcible conversion of 500 Hindus in Pakistan | पाकिस्तानमधील 500 हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर

पाकिस्तानमधील 500 हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर

पाकिस्तान : पाकिस्तानमधील सिंध प्रांतात असलेल्या मातली जिल्ह्यातील जवळपास 500 हिंदूंचे जबरदस्तीने  मुस्लिमांमध्ये धर्मांतर केले आहे. गेल्या 25 मार्चला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पार्टीच्या पदाधिका-यांनी हिंदूंचे धर्मांतर जबरदस्तीने करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगच्या पदाधिका-यांनी मातली जिल्ह्यातील जवळपास 50 कुटुंबीयांतील 500 लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडले. धर्मांतर करण्यात आलेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त भारतात स्थानिक होण्यासाठी आले लोक होते. मात्र, त्यांना लॉन्ग टर्म व्हिसा मिळाला नव्हता, त्यामुळे ते पुन्हा पाकिस्तान गेले होते. 


गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानमधील हिंदूंची स्थिती अत्यंत वाईट असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्याचबरोबर, येथील हिंदूंची अस्तित्वासाठी धर्म बदलावा लागणे, ही त्यांची लाचारी बनली आहे. धर्म बदलणारांना अनेक संघटना राहण्यायोग्य घर, सामान, काम करण्यासाठी शिवणयंत्रासारखी साधने, शेतीसाठी वर्षभर पाण्याचे आमिष दाखवतात.
 

Web Title: Forcible conversion of 500 Hindus in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.