शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:35 IST

इस्त्रायलच्या हल्ल्याचा हेतू इराणी जनतेला त्रास देण्याचा नाही कारण त्यांचे उद्दिष्ट इथल्या सरकारच्या धोक्याला दूर करणे आहे असं राज शाह यांनी म्हटलं.

Iran-Israel Conflict: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. आता इराणमध्ये अंतर्गतच काही लोक उघडपणे इस्त्रायलचे समर्थन करत आहेत. पूर्वी इराणच्या सत्तेवर राज करणाऱ्या राजाचा मुलगा सध्याचे इराणमधील सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्याविरोधात आवाज उचलत आहे. या व्यक्तीचे नाव आहे रजा शाह पहलवी. ज्यांच्या घराण्याने १९७९ पर्यंत इराणवर सत्ता भोगली. आता त्याच घराण्याने खामेनेई यांच्याविरोधात एल्गार केला आहे.

इराणमध्ये सत्ता बदलाची वेळ आलीय

राज शाह पहलवी यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, इराणमध्ये सत्तापालट करण्याची वेळ आली आहे. आमची वेळ आली आहे. हे युद्ध इराणी लोकांचे नाही तर खामेनेई यांचे आहे. युद्धाचा शेवट काहीही होऊ शकतो. जे सरकार कमकुवत करेल. ४० वर्षाहून अधिक काळ मी इराणच्या लोकशाहीसाठी लढत आहे असं त्यांनी सांगितले. राज शाह यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट करून इराणमध्ये सत्तापालट करण्यासाठी जगाकडे मागणी केली आहे.

तसेच इस्त्रायलच्या हल्ल्याचा हेतू इराणी जनतेला त्रास देण्याचा नाही कारण त्यांचे उद्दिष्ट इथल्या सरकारच्या धोक्याला दूर करणे आहे. इस्त्रायली हल्ल्यामुळे इराणचे सरकार कमकुवत होते. त्यानंतर इराणमध्ये सत्ता बदल करण्याचा मार्ग खुला होईल असंही शाह पहलवी यांनी म्हटलं आहे. इस्त्रायल आणि इराणचे युद्ध आता आणखी तीव्र झाले आहे. ज्यामुळे भारत, अमेरिकेसह अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना तिथून परतायला सांगितले आहे. इस्त्रायली सैन्य सातत्याने तेहरानवर हल्ला करत आहे. इराणनेही तेल अवीवमधील इस्त्रायली गुप्तचर यंत्रणेचे मुख्यालय हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केले आहे.

सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

दरम्यान,  इराण इस्रायल मधील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर वळणांवर पोहोचत असून दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. सोमवारी संध्याकाळी इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हवाई हल्ला केला. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर बॉम्ब टाकले. हल्ल्याच्या वेळी एक महिला अँकर लाइव्ह शो करत होती. सुदैवाने ती या हल्ल्यात बचावली.  

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायल