फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:58 IST2025-12-11T15:58:39+5:302025-12-11T15:58:56+5:30
युरोपमध्ये ही परिस्थिती आता अधिक प्रमाणात दिसू लागली आहे. नवीकरणीय ऊर्जा स्रोतांद्वारे उत्पादन वाढल्यामुळे आणि मागणी कमी झाल्यावर विजेच्या किमती वेगाने शून्यावर येतात आणि काहीवेळा त्या नकारात्मक स्तरावरही जातात, म्हणजे वीज वापरण्यासाठी कंपन्या ग्राहकांना पैसे देत आहेत.

फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
एका महत्त्वपूर्ण आणि दुर्मिळ घडामोडीमध्ये, युरोपातील फ्रान्स या देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात झालेल्या प्रचंड वाढीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्रान्सच्या सरकारने नागरिकांना काही तासांसाठी मोफत वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ८ डिसेंबर रोजी फ्रान्सच्या 'डे-अहेड मार्केट'मध्ये विजेची किंमत शून्यावर आली. 0यंदा युरोपात हिवाळ्याची सुरुवात अपेक्षेपेक्षा उबदार आहे. तापमान जास्त असल्याने नागरिकांनी हीटर आणि ब्लोअर्ससारखी उष्णता देणारी उपकरणे वापरणे कमी केले आहे. ज्यामुळे विजेची मागणी अचानक मोठ्या प्रमाणात घटली आहे. याच दरम्यान, देशात सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे पवन ऊर्जा प्रकल्पांमधून विजेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले.
फ्रान्सचे अनेक अणुऊर्जा प्रकल्प जवळपास ८५% क्षमतेने कार्यरत आहेत. या प्रकल्पांमुळे ग्रिडमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त वीज जमा झाली आहे. आता लोक वापरत नाहीत, वीज तर तयार झालेली आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्यामुळे फ्रान्समध्ये तात्पुरता ऊर्जा अधिशेष निर्माण झाला, परिणामी विजेचे दर शून्यावर आले आणि लोकांना प्रत्यक्षात मोफत वीज मिळाली आहे.
युरोपमध्ये ही परिस्थिती आता अधिक प्रमाणात दिसू लागली आहे. नवीकरणीय ऊर्जा स्रोतांद्वारे उत्पादन वाढल्यामुळे आणि मागणी कमी झाल्यावर विजेच्या किमती वेगाने शून्यावर येतात आणि काहीवेळा त्या नकारात्मक स्तरावरही जातात, म्हणजे वीज वापरण्यासाठी कंपन्या ग्राहकांना पैसे देत आहेत. २०२२ मध्ये आलेल्या ऊर्जा संकटानंतर युरोपात ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे.