शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Flood in UAE: यूएईच्या वाळवंटात मुसळधार पाऊस, महापुरात घर, दुकाने, मॉल सारे काही बुडाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:05 IST

Flood in UAE: संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) पूर्व भागात मुसळधार पावसामुळे महापूर आला असून, अनेक भाग जलमय झाले आहेत. पुरामुळे अनेक घरं पाण्यात बुडाली आहेत. तर काही घरांचं नुकसान झालं आहे.

अबुधाबी - संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) पूर्व भागात मुसळधार पावसामुळे महापूर आला असून, अनेक भाग जलमय झाले आहेत. पुरामुळे अनेक घरं पाण्यात बुडाली आहेत. तर काही घरांचं नुकसान झालं आहे. जागोजागी वाहने पाण्यात अडकलेली दिसत आहेत. लोकांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात येत आहे. या पुरामध्ये खासगी आणि सार्वजनित संपत्तीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

यूएईमध्ये गेल्या बुधवारपासून सुरू झालेला पाऊस हा गुरुवारीदेखील सुरू होता. दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात पूर आला आहे. पुराचा सर्वाधिक फटका हा शारजाह, राज अल खैमाह आणि फुजैराह यासारख्या भागांना बसला आहे. राज अल खैमाहमधील अनेक भागात पावसामुळे हानी झाली आहे.

स्टॉर्म सेंटरकडून करण्यात आलेल्या नव्या ट्विटमध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले दिसत आहेत. यामधील अल बयाद येथील व्हिडीओ भयावह आहे. शारजाह पोलिसांनी स्थानिकांना देशातील पूर्व भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. एनसीएमने काही क्षेत्रांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. एनसीएमने दिलेल्या माहितीनुसार यूएईमध्ये २७ वर्षांनंतर अशा प्रकारचा मुसळधार पाऊस पडला आहे.

शारजाह पोलिसांनी लोकांना सुरक्षाविषयक निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच पूरग्रस्त भागापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच लष्करही बचाव कार्यात गुंतले आहे. प्रशासनाने सुरक्षा एजन्सींना अलर्टवर ठेवले आहे.  

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीRainपाऊसfloodपूर