शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

एअरहोस्टेसचा गौप्यस्फोट; प्रायव्हेट जेटमधील प्रवासातील ‘काळं सत्य’ उघड; लाखोंचा पगार, सेक्स अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 13:13 IST

एका माजी एअरहोस्टेसने सौदी अरेबियाच्या एका प्रिंसची, रशिया आणि जर्मनमधील अब्जाधीशांची पोलखोल केली आहे.

ठळक मुद्देप्रायव्हेट जेटमध्ये नोकरीसाठी सेक्सपासून स्वच्छतेपर्यंत सगळं काम करावं लागतं.प्रायव्हेट जेटमध्ये नोकरी करण्यापूर्वी मला ८ गोपनीय करारावर सह्या कराव्या लागल्या. नोकरी मिळाल्यानंतर माझं आयुष्य बदललं. आता मी आलिशान जीवन जगू लागली

जगभरातील अब्जाधीश, प्रिंस आणि अनेक प्रसिद्ध चेहरे हवाई वाहतूक करण्यासाठी खासगी विमानांचा वापर करतात. कोट्यवधी रुपयांचे हे प्रायव्हेट जेट आकाशात एका चालत्या-फिरत्या महालाप्रमाणे असतात. ज्यात जगातील अनेक सोयी-सुविधा उपलब्ध असतात. इतकचं नाही तर जेटने ग्राहकांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित एअरहोस्टेटदेखील ठेवल्या आहेत. आता आलीशान प्रायव्हेट जेटच्या या प्रवासाबाबत जगाला हैराण करणारा खुलासा समोर आला आहे.

एका माजी एअरहोस्टेसने सौदी अरेबियाच्या एका प्रिंसची, रशिया आणि जर्मनमधील अब्जाधीशांची पोलखोल केली आहे. सास्कीया स्वान नावाच्या या एअरहोस्टेसने सांगितले की, प्रायव्हेट जेटमध्ये नोकरीसाठी सेक्सपासून स्वच्छतेपर्यंत सगळं काम करावं लागतं. एकदा तर एका पोपटाची देखभाल करण्यासाठी मला भाग पाडलं होतं असंही एअरहॉस्टेसने दावा केला.  

काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

एअरहोस्टेसने लिहिलेल्या पुस्तकात ज्याचं नाव सीक्रेट ऑफ ए प्रायव्हेट फ्लाइट अटेंडडेंट आहे. त्यात लिहिलं आहे की, प्रायव्हेट जेटमध्ये नोकरी करण्यापूर्वी मला ८ गोपनीय करारावर सह्या कराव्या लागल्या. त्यानंतर रशियन उद्योगपतीकडून मला वर्षाला ४१ लाखांचे पॅकेजची नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर माझं आयुष्य बदललं. आता मी आलिशान जीवन जगू लागली. डिझायनर कपड्यांमध्ये प्रवास करू लागले. यावेळी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहावे लागत होते. त्या बदल्यात तिला दररोज भत्ताही मिळाला. या आलिशान नोकरीची दुसरी काळी बाजूही आहे असं ती म्हणाली.

सास्कीयाला सांगण्यात आले होते की, ती आपल्या बॉसची पत्नी इरिना आणि त्यांच्या दोन मुलांसह प्रवास करणार आहे. रशियाच्या अब्जाधीशांच्या पत्नीसह सास्कीया इस्तंबूलहून लॉस एंजेलिसला गेली. परंतु अब्जाधीशाने लवकरच त्यांच्या पत्नीला सोडलं आणि मला सांगितलं तिच्या जीवनाशी निगडीत सगळे सीक्रेट नष्ट  कर. त्यात इरिनाचे बूट, बॅग इतर गोष्टींचा समावेश होता. इरिनाचा एक केसही विमानात दिसता कामा नये असं मला बजावण्यात आला नाहीतर तुझी नोकरी जाईल अशी धमकीही मिळाली. त्यानंतर त्या बॉसची गर्लफ्रेंड मॉडेल सावनाह समोर आली.

अय्याशी करण्यासाठी मला सेक्स करण्यासाठी भाग पाडलं

सास्कीयाने यापुढे जाऊन म्हटलं की, रशियन अब्जाधीशाला माझ्याकडून आणखी काहीतरी हवं होतं. न्यूयॉर्क प्रवासावेळी मला सांगण्यात आले की, जर तिने बॉस पॉवेलसोबत सेक्स केला नाही तर तिला नोकरीवरून काढण्यात येईल. कारण सेक्स हा देखील कामाचा भाग होता. कर्जात बुडालेल्या सास्कीयानं बॉसच्या या अटीचं पालन करावंच लागलं. परंतु तिच्या डोळ्यातून पाणी आले. सास्कीयाला एक बॉक्स मिळाला त्यात कपडे आणि हिऱ्याचा हार होता. पॉवेलने सास्कीयासोबत डीनर केला आणि तिला पेंटहाऊसला घेऊन गेला. माझ्यासोबत सेक्स केल्यानंतर मी एक वेश्या आहे का असा प्रश्न मला पडला. माझ्या डोक्यातून हे काहीच जात नव्हतं. त्यानंतर वारंवार या गोष्टी होत होत्या.

सौदीच्या प्रिंसने हवेतच गर्लफ्रेंडसोबत मज्जा केली

अनेक वर्षानंतर सास्कीया सौदी प्रिंस हुसैन यांच्यासोबत काम करू लागली. येथेही तिचं सीक्रेट अफेअर होतं. एकदा सास्कीयानं प्रिंस आणि त्याच्या गर्लफ्रेंडला हवेत सेक्स करताना पकडलं. सास्कीयानं जेव्हा इथं नोकरीला अर्ज केला तेव्हा हे विमान महिलांसाठी सुरक्षित असल्याचं सांगितले गेले होते. जेद्दा येथे फ्लाइट अटेंडेंटला महालात ठेवलं जातं. शाही परिवारासोबत शारिरीक संबंध बनवण्यासाठी खूप पैसे देतात. एकदा तर जर्मन अब्जाधीशासोबत काम करताना त्याच्या पोपटाला सांभाळण्याचं कामही मला करावं लागलं.

या नोकरीत आल्यापासून सास्कीयानं कॅरिबियन देशांपासून मालदीवपर्यंत प्रवास केला. यावेळी दिवसाला ४५० डॉलर वेतन आणि १२५ डॉलर राहण्याचा खर्च दिला जात होता. या विमानात कोणीही जेवण बनवणारं नसायचं म्हणून सगळं काम स्वत:ला करावं लागत होतं. विमानात लागणारं साहित्य स्वत:ला खरेदी करावं लागतं. याचे पैसे मालकाकडून दिले जातात. सास्कीयानं लिहिलेल्या या पुस्तकाची चर्चा सध्या जगभरात सुरू आहे.