बगदादमध्ये 5क् मृतदेह आढळले
By Admin | Updated: July 10, 2014 02:26 IST2014-07-10T02:26:13+5:302014-07-10T02:26:13+5:30
बगदादच्या दक्षिणोकडील भागात इराकी अधिका:यांना 50 मृतदेह आढळले असून, त्यांचे हात व डोळे बांधलेले आहेत.

बगदादमध्ये 5क् मृतदेह आढळले
बगदाद : बगदादच्या दक्षिणोकडील भागात इराकी अधिका:यांना 5क् मृतदेह आढळले असून, त्यांचे हात व डोळे बांधलेले आहेत.
लष्करी प्रवक्ता ब्रिगे. जन. साद मान इब्राहिम यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी हिल्ला येथील एका शेतात हे मृतदेह आढळले. हिल्ला हे शियाबहुल शहर बगदादपासून 95 कि.मी. अंतरावर आहे. मृत व्यक्ती कोण आहेत, तसेच कोणत्या परिस्थितीत त्यांना मारले असावे याची चौकशी चालू आहे. इराकमध्ये सध्या चाललेल्या संघर्षात गोळ्या घातलेले मृतदेह आढळणो ही नवी बाब नाही.
इराकमध्ये सुन्नी बंडखोरांनी मोठा भूभाग ताब्यात घेतला असून, अनेक भागांत अद्यापही लढाई सुरूच आहे. (वृत्तसंस्था)