अमेरिकेतील वॉलमार्टमध्ये गोळीबार, दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 09:34 IST2017-11-02T07:29:52+5:302017-11-02T09:34:39+5:30

अमेरिकेतील कोलोरॅडो येथील डेन्व्हर उपनगरातील एका वॉलमार्टमध्ये अज्ञाताकडून गोळीबारात करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Fishermen in Walmart, USA, have been injured | अमेरिकेतील वॉलमार्टमध्ये गोळीबार, दोन जण ठार

अमेरिकेतील वॉलमार्टमध्ये गोळीबार, दोन जण ठार

कोलोरॅडो : अमेरिकेतील कोलोरॅडो येथील डेन्व्हर उपनगरातील एका वॉलमार्टमध्ये अज्ञाताकडून गोळीबारात करण्यात आल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोलोरॅडो येथील डेन्व्हर उपनगरापासून उत्तरपूर्व भागात असलेल्या या वॉलमार्टमध्ये हा गोळीबार करण्यात आला. यामध्ये काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच, हा गोळीबार येथील स्थानिकवेळेनुसार संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हल्लेखोराचा शोध घेत आहेत. तसेच, पोलिसांनी या गोळीबाराबाबत कोणतीही माहिती दिली नाही किंवा हल्लेखोराला ताब्यात घेतल्याचे कळवले नाही.  

याचबरोबर काल न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन शहरात एका ट्रक चालकाने पादचा-यांना चिरडल्याने एकच खळबळ उडाली.  या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून सैफुलो असे या ट्रक चालकाचे नाव आहे. तो इसिस या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी असल्याचे समोर येत आहे. 



 

 

Web Title: Fishermen in Walmart, USA, have been injured