आधी पत्नीला केले ठार; पाकच्या मंत्र्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:37 IST2018-02-03T01:37:16+5:302018-02-03T01:37:42+5:30

पाकिस्तानातील सिंध प्रांताचे नियोजन व विकासमंत्री मीर हझर खान बिजरानी यांनी कराची येथील निवासस्थानी पत्नी फरीहा रझाक हरुन हिची गोळ््या घालून हत्या केली आणि त्यानंतर त्याच मार्गाने स्वत:लाही संपविले. मंत्री बिजरानी यांचे वय ७१ होते.

First wife killed; The Minister of Pakistan's Suicide | आधी पत्नीला केले ठार; पाकच्या मंत्र्याची आत्महत्या

आधी पत्नीला केले ठार; पाकच्या मंत्र्याची आत्महत्या

कराची - पाकिस्तानातील सिंध प्रांताचे नियोजन व विकासमंत्री मीर हझर खान बिजरानी यांनी कराची येथील निवासस्थानी पत्नी फरीहा रझाक हरुन हिची गोळ््या घालून हत्या केली आणि त्यानंतर त्याच मार्गाने स्वत:लाही संपविले. मंत्री बिजरानी यांचे वय ७१ होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीर हझर खान बिजरानी व त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत भांडणे होत होती. या दोघांचे मृतदेह कराची येथील खयाबान-ए-जाँबाज या भागातील त्यांच्या बंगल्यातील पहिल्या मजल्यावर आढळले. गुरुवारी दुपारी अडीच वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. पोलिसांनी व फॅरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून बोटांचे ठसे, रक्ताचे नमुने व अन्य पुरावे गोळा केले. त्याचप्रमाणे हझर खान बिजरानी यांच्या बंगल्यामध्ये बसविलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
मीर हझर खान बिजरानी यांच्या डोक्यात गोळी लागली असून, त्यांची पत्नी फरीहा रझाक हरुन हिला दोन गोळ््या लागल्या आहेत. त्यापैैकी एक पोटात व एक डोक्यात शिरली. पिस्तुलामधून या गोळ््या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरवाजा लागला फोडावा
या दोघांचे मृतदेह जिथे आढळून आले, ती खोली आतून बंद करण्यात आली होती. मीर हझर खान बिजरानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या खोलीचा दरवाजा नोकरांच्या मदतीने तोडला व ते आत शिरल्यानंतर त्यांना बिजरानी व त्यांच्या पत्नीचा मृतदेह तेथे आढळून आला असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: First wife killed; The Minister of Pakistan's Suicide