शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

युएईने पहिल्यांदाच भारतीय चिमुकलीसाठी नियम बदलले; वाचा कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 15:45 IST

युएईमध्ये मुस्लिम पुरुष गैर मुस्लिम महिलेशी लग्न करू शकतो, पण मुस्लिम महिला गैरमुस्लिम पुरुषाशी लग्न करू शकत नाही. 

दुबई : संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक हिंदू वडील आणि मुस्लिम आई (दोन्ही भारतीय) यांच्या 9 महिन्यांच्या मुलीला नियम बदलून जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. ही घटना युएईमध्ये पहिल्य़ांदाच घडली आहे. नियमांनुसार युएईमध्य़े मुस्लिम पुरुष गैर मुस्लिम महिलेशी लग्न करू शकतो, पण मुस्लिम महिला गैरमुस्लिम पुरुषाशी लग्न करू शकत नाही. 

खलीज टाईम्सनुसार शारजाहमध्ये राहणारे किरण बाबू य़ांनी सनम सिद्दीकी यांच्याशी केरळमध्ये 2016 मध्ये लग्न केले होते. दांपत्याला जुलै 2018 मध्ये मोठ्या संकटाचा सामना करावा लागला जेव्हा त्यांच्या मुलीचा जन्म झाला. 

किरण बाबू यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे अबुधाबीचा व्हिसा आहे. त्यांना विम्याचे संरक्षण मिळाले आणि त्यांनी पत्नीला अमिरात मेडिओर 24X7 हॉस्पिटलमध्ये भरती केले. मात्र, मुलीच्या जन्मानंतर त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यास नकार देण्य़ात आला. कारण मुलीचे वडील हिंदू आहेत, असे देण्यात आले. मुलीचे जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी तेथील न्यायालयाचे दरवाजेही खटखटावले. यावर 4 महिने युक्तीवादही झाला. पण निराशा हाती आली. यानंतर त्यांच्या मुलीकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नव्हते. 

मात्र, युएईच्या प्रशासनाने 2019 हे वर्ष सहनशीलता वर्ष घोषित केल्याचा फायदा किरण यांना झाला. सौदीने त्यांच्या देशामध्ये संहिष्णुता जोपासण्यासाठी पाऊल उचलले आहे. कारण त्यांच्या देशात सर्व संस्कृतींमध्ये ताळमेळ बसविण्यासाठी आणि लोकांमध्ये एकमेकांमध्ये स्वीकार्यता येणे हा त्यामागिल उद्देश आहे.

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती