पहिल्या तीन ओलिसांची सुटका; 'गाझापट्टीत बंदुका थंडावल्या', बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 23:27 IST2025-01-19T23:27:21+5:302025-01-19T23:27:39+5:30
इस्रायली ओलिस रोमी गोनेन, एमिली दमारी आणि डोरॉन स्टाइनब्रेचर यांना कोणत्याही मदतीशिवाय चालता येत होते. पश्चिम गाझा शहरातील अल-सराया चौकात या तिघींना इस्रायलच्या ताब्यात देण्यात आले.

पहिल्या तीन ओलिसांची सुटका; 'गाझापट्टीत बंदुका थंडावल्या', बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया
दीड वर्षांनी गाजापट्टीत आज चिरकाल शांतता पसरली आहे. इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी लागू झाल्यानंतरही इस्रायलने गाझापट्टीवर हल्ला चढविला होता. यावेळी हमासने आपल्याला कोणत्या ओलिसांना सोडणार याची यादी दिली नाही, लेट झाला असे कारण दिले होते. यानंतर हमासने यादी देत, आज अखेर तीन महिलांची सुटका केली आहे.
यामध्ये रोमी गोनन, एमिली डामारी आणि डोरोन स्टीनब्रेखर यांचा समावेश आहे. तिन्ही बंधकांना इस्रायली संस्था रेड क्रॉसच्या हवाली करण्यात आले. हमासने याची माहिती दिली. यानंतर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची प्रतिक्रिया आली आहे. आज गाझामध्ये बंदुका शांत झाल्याचे ते म्हणाले.
इस्रायली ओलिस रोमी गोनेन, एमिली दमारी आणि डोरॉन स्टाइनब्रेचर यांना कोणत्याही मदतीशिवाय चालता येत होते. पश्चिम गाझा शहरातील अल-सराया चौकात या तिघींना इस्रायलच्या ताब्यात देण्यात आले.
गाझामध्ये युद्धबंदीचा समझोता यशस्वी झाला आहे. मदतीसाठी शेकडो ट्रक गाझामध्ये प्रवेश करत आहेत. एवढ्या वेदना आणि विनाशानंतर आज गाझातील बंदुका शांत झाल्या आहेत. मध्य पूर्वेमध्ये मोठे युद्ध पेटणार अशी भविष्यवाणी अनेकांनी केली होती. परंतू, आम्ही ते रोखण्यात यशस्वी ठरलो. आता गाझा समझोता लागू करण्याची जबाबदारी ट्रम्प यांची आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे. तसेच हमास पुन्हा संगठीत होण्याची आता कोणतीही चिंता राहिलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.