'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 14:47 IST2025-08-24T14:46:32+5:302025-08-24T14:47:08+5:30

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी बांगलादेशला भेट दिली आणि बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी सारख्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांनी द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर आणि सार्कचे पुनरुज्जीवन करण्यावर चर्चा केली.

'First resolve the 1971 issue, then we will discuss', insult to Pakistan's Foreign Minister on Bangladeshi soil | 'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान

'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान

बांगलादेशमधील शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशमधी संबंध पुन्हा सुधारत आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाकर दार यांनी बांगलादेशला भेट दिली. त्यांनी तेथील राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली.

यादरम्यान, त्यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांची भेट घेतली. दार यांनी नॅशनल सिटीझन पार्टीच्या नेत्यांशीही चर्चा केली, या पक्षाचे बांगलादेशमध्ये सरकार आहे.

समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार

सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी शिष्टमंडळाने दार यांची भेट घेतली. त्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली आणि दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेचे पुनरुज्जीवन करण्याची गरज यावर भर दिला. पाकिस्तानने बांगलादेशात निष्पक्ष निवडणुका घेण्याची इच्छाही व्यक्त केली.

१९७१ च्या समस्या सोडवण्याची गरज- बांगलादेश

दरम्यान, नॅशनल सिटीझन पार्टी सह अनेक बांगलादेशी नेत्यांनी पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी १९७१ च्या समस्या सोडवण्याची गरज अधोरेखित केली आहे.

१९७१ चा वाद काय?

बांगलादेश १९७१ च्या घटनांना नरसंहार म्हणत आहे. त्या वर्षी, पश्चिम पाकिस्तान सरकारने पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) मधील बंगाली रहिवाशांवर सामूहिक हत्याकांड, बलात्कार आणि इतर अत्याचारांची नऊ महिने विनाशकारी मोहीम राबवली, तर पाकिस्तानने त्याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली.

बांगलादेशी नेत्यांनी नेहमीच पाकिस्तानला माफी मागण्यास सांगितले. पण, पाकिस्तानने तसे करण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांनी किमान १० लाख बंगाली महिलांवर अत्याचार केला आणि लाखो बंगालींची हत्या केली होती.

Web Title: 'First resolve the 1971 issue, then we will discuss', insult to Pakistan's Foreign Minister on Bangladeshi soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.