माजी क्रिकेटपटू वासीम अक्रमच्या गाडीवर गोळीबार

By Admin | Updated: August 5, 2015 18:02 IST2015-08-05T17:56:24+5:302015-08-05T18:02:10+5:30

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासीम अक्रम याच्या गाडीवर बुधवारी अज्ञांताकडून गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त असून या गोळीबारात वासीम आक्रम वाचला आहे.

Firing on former cricketer Wasim Akram's car | माजी क्रिकेटपटू वासीम अक्रमच्या गाडीवर गोळीबार

माजी क्रिकेटपटू वासीम अक्रमच्या गाडीवर गोळीबार

>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. ५ - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासीम अक्रम याच्या गाडीवर बुधवारी अज्ञांताकडून गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त असून  या गोळीबारात वासीम आक्रम सुदैवाने बचावला आहे.  
कराचीतील नॅशनल स्टेडियमजवळील कारसाझ रोडवर वासीम अक्रम याच्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणा-या व्यक्तींचा ओळख पटली नसून यामध्ये वासीम अक्रमला कोणतीही इजा झाली नाही.  दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून या घटनेची माहिती घेत आहेत. तसेच, गोऴीबार करणा-या अज्ञातांच्या गाडीचा नंबर नोट केला असून तो पोलिसांना दिला असल्याचे वासीम अक्रम याने सांगितले.   

Web Title: Firing on former cricketer Wasim Akram's car