अमेरिकेतील फ्लोरिडा येथे गोळीबार, 5 ठार

By Admin | Updated: June 5, 2017 21:06 IST2017-06-05T20:51:42+5:302017-06-05T21:06:37+5:30

अमेरिकेतील फ्लोरिडा शहरामध्ये आज सकाळी गोळीबाराची घटना घडली असून, या गोळीबारात

Firing in Florida, USA, 5 killed in US | अमेरिकेतील फ्लोरिडा येथे गोळीबार, 5 ठार

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे गोळीबार, 5 ठार

ऑनलाइन लोकमत
मियामी, दि. 5 - अमेरिकेतील फ्लोरिडा शहरामध्ये आज सकाळी गोळीबाराची घटना घडली असून, या गोळीबारात 5 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. फ्लोरिडा शहरातील औद्योगिक भागात हा गोळीबार झाला आहे. 
 
फ्लोरिडामध्ये झालेला  हा गोळीबार कुणी केला, यासंदर्भात सुरुवातीला संभ्रम होता. मात्र आता ही दहशतवादी घटना नसून कामाच्या ठिकाणी असलेल्या वादातून गोळीबार झाल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे.  मात्र घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात असून, ऑरेंज कौंटी पोलिसांकडून गोळीबाराच्या घटनेची चौकशी सुरू आहे. ऑरेंज कौंटीमधील  महापौरांच्या कार्यालयाने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 
 
 गेल्या वर्षी फ्लोरिडातील याच भागात एका गे नाइटक्लबमध्ये गोळीबार झाला होता. त्या गोळीबारात 49 जणांचा मृत्यू झाला होता. तर डझनभर जण जखमी झाले होते. 
 

Web Title: Firing in Florida, USA, 5 killed in US