कराचीमधील अफगाणिस्तानच्या दुतावासात गोळीबार, एकाचा मृत्यू

By Admin | Updated: February 6, 2017 14:15 IST2017-02-06T14:15:22+5:302017-02-06T14:15:22+5:30

अफगाणिस्तान दुतावासात सुरक्षारक्षकाने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे

Firing in Afghanistan's Karachi's Afghani, one of the deaths | कराचीमधील अफगाणिस्तानच्या दुतावासात गोळीबार, एकाचा मृत्यू

कराचीमधील अफगाणिस्तानच्या दुतावासात गोळीबार, एकाचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 6 - अफगाणिस्तान दुतावासात सुरक्षारक्षकाने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. कराचीमधील क्लिफ्टन परिसरात असलेल्या अफगाणिस्तान दुतावासामधील लॉबीत सुरक्षारक्षकाने अचानक फायरिंग करण्यासा सुरुवात केली. गोळीबारात दुतावासामधील कर्मचा-याचा मृत्यू झाला असून त्याचं नाव झाकी अद्दू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
गोळीबार करणारी व्यक्ती अफगाणिस्तानचा नागरिक असून त्याला अटक करण्यात आली आहे. वैयक्तिक भांडणातून हा गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुतावासाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आलं आहे. सर्व परिसर सील करण्यात आला आहे. 
 

Web Title: Firing in Afghanistan's Karachi's Afghani, one of the deaths