विवाह समारंभातील फटाके महागात
By Admin | Updated: April 1, 2015 23:51 IST2015-04-01T23:51:37+5:302015-04-01T23:51:37+5:30
पाकिस्तानातील प्रथेप्रमाणे विवाहसमारंभात फटाके उडविणे पाकमधील भावांना फारच महागात पडेल असे दिसत आहे. हे फटाके नव्हते तर

विवाह समारंभातील फटाके महागात
कराची : पाकिस्तानातील प्रथेप्रमाणे विवाहसमारंभात फटाके उडविणे पाकमधील भावांना फारच महागात पडेल असे दिसत आहे. हे फटाके नव्हते तर बॉम्बस्फोट होते असा आरोप करीत पोलिसांनी दहशतवादी असल्याचा आरोप ठेवून संयुक्त विवाह समारंभातून दोन भावांना अटक केली असून, त्यांना दीर्घकाळ कारावास भोगावा लागेल अशी चिन्हे आहेत.
पाकिस्तानात विवाह समारंभात दारू उडविणे ही परंपरा आहे. या विवाह समारंभातही आतषबाजी करण्यात आली. त्याचबरोबर आवाजाचे फटाके उडविण्यात आले. या समारंभात त्याचा अतिरेक करण्यात आला असा पोलिसांचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)