शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Fire in Mexico Detention Centre: मेक्सिकोतील इमिग्रेशन डिटेंशन सेंटरमध्ये अग्नितांडव; 39 लोकांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 20:37 IST

Fire in Mexico Detention Centre: अमेरिकन बॉर्डरजवळ उत्तर मेक्सिकोत ही दुर्दैवी घटना घडली.

Fire in Mexico Detention Centre: अमेरिकेच्या शेजारील देश मेक्सिकोमध्ये एक मोठी जीवघेणी घटना घडली आहे. टेक्सासच्या एल पासोजवळील सिउदाद जुआरेझ येथील इमिग्रेशन डिटेंशन सेंटरमध्ये भीषण आग लागली. या घटनेत 39 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. परप्रांतीयांना येथे कोठडीत ठेवण्यात आले होते. आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. 

मेक्सिको अमेरिकेच्या दक्षिणेला आहे. या दोन देशांची हजारो किलोमीटरची सीमा आहे. मेक्सिकोमधून अमेरिकेत येणाऱ्या लोकांना सीमेजवळील इमिग्रेशन डिटेंशन सेंटरमध्ये ठेवले जाते. टेक्सासमधील या सेंटरमध्ये अचानक आग लागली, यात 39 लोकांचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले.  या घटनेनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये अनेक व्हॅन जळालेल्या लोकांना घेऊन जाताना दिसत आहेत. 

एकीकडे रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे पथक अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात गुंतले होते, तर दुसरीकडे मृतांचे मृतदेह उचलण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत अनेक मृतदेह शवागारात पाठवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत जळालेल्या काही लोकांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उपचारात मदत करण्यासाठी अमेरिकन डॉक्टरांची टीमही पोहोचली आहे. या घटनेतील बहुतांश मृत व्हेनेझुएलातील आहेत.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयMexicoमेक्सिकोAmericaअमेरिकाfireआगDeathमृत्यू