दक्षिण कोरियात रुग्णालयात भीषण आग, 41 जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 14:20 IST2018-01-26T14:18:59+5:302018-01-26T14:20:37+5:30
दक्षिण कोरियामधील मिरयांग शहरात एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

दक्षिण कोरियात रुग्णालयात भीषण आग, 41 जणांचा होरपळून मृत्यू
सेऊल - दक्षिण कोरियामधील मिरयांग शहरात एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दक्षिण कोरियात आग लागण्याची एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दक्षिण कोरियातील सरकारी संवाद समिती योहान्पने ही माहिती दिली आहे. नॅशनन फायर एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आग लागलेल्या सहा मजली इमारतीत एक नर्सिंग होम आणि रुग्णालय आहे. आग पहिल्या माळ्यापासून सुरु झाली होती. आगीमुळे जखमी झालेल्यांपैकी 13 जणांची परिस्थिती नाजूक आहे.
जखमींची प्रकृती नाजूक असल्या कारणाने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थितीची माहिती घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. आग लागली तेव्हा रुग्णालयात जवळपास 200 लोक उपस्थित होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
41 dead after fire broke out in a hospital in South Korea's Seoul: AFP
— ANI (@ANI) January 26, 2018