फिनलॅंडच्या टुर्कू शहरात भररस्त्यात नागरिकांवर चाकू हल्ला, एका संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 23:57 IST2017-08-18T21:38:48+5:302017-08-18T23:57:39+5:30
फिनलॅंडच्या टुर्कू शहरात भररस्त्यात अनेक नागरिकांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे., चाकू हल्ला करणा-यांपैकी एका संशयिताला पोलिसांनी गोळी मारून जखमी केलं

फिनलॅंडच्या टुर्कू शहरात भररस्त्यात नागरिकांवर चाकू हल्ला, एका संशयिताला अटक
'टुर्कू, दि. 18 - फिनलॅंडच्या टुर्कू शहरात भररस्त्यात अनेक नागरिकांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. चाकू हल्ला करणा-यांपैकी एका संशयिताला पोलिसांनी गोळी मारून जखमी केलं असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेनंतर अनेकजण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.
या घटनेत किती जण जखमी झाले आहेत याबाबत अजून नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. चाकू हल्ला करणा-या एका संशयिताला पोलिसांनी पायावर गोळी मारून जखमी केलं त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत अन्य हल्लेखोरांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पोलीस इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हल्ला नेमका कोणी केला, दहशतवादी हल्ला आहे की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
BREAKING: Police in Finland say they have shot a man in the leg suspected of stabbing several people in western city of Turku.
— The Associated Press (@AP) August 18, 2017