युक्रेनमध्ये भीषण चकमक; ५० ठार

By Admin | Updated: February 11, 2015 23:42 IST2015-02-11T23:42:37+5:302015-02-11T23:42:37+5:30

गेल्या दहा महिन्यांपासूनच्या संघर्षावर तोडगा काढून शांतता करार करण्यासाठी प्रयत्न होत असताना युक्रेन बंडखोरांच्या भीषण हल्ल्याने हादरले

Fierce flint in Ukraine; 50 killed | युक्रेनमध्ये भीषण चकमक; ५० ठार

युक्रेनमध्ये भीषण चकमक; ५० ठार

कीव : गेल्या दहा महिन्यांपासूनच्या संघर्षावर तोडगा काढून शांतता करार करण्यासाठी प्रयत्न होत असताना युक्रेन बंडखोरांच्या भीषण हल्ल्याने हादरले. पूर्वेकडील लष्करी मुख्यालयावर बंडखोरांनी रॉकेट हल्ला केला. गेल्या चोवीस तासांत सुरक्षा दल आणि बंडखोरांच्या धुमश्चक्रीत ५० जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
बंडखोरांच्या हल्ल्यात १९ सैनिक मारले गेले असून ७८ जखमी झाले आहेत, तर लष्करी मुख्यालयावरील रॉकेट हल्ल्यात पाच सैनिक ठार झाले, असे लष्कराचे प्रवक्ते व्लादीसाल्व्ह सलेन्झयोव्ह यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

 

 

Web Title: Fierce flint in Ukraine; 50 killed