शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या तेलसाठ्यांवर भीषण हल्ले; ज्वालांनी तेहरानचे आकाश व्यापले, आणखी हल्ले होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 05:20 IST

इस्रायलचा इशारा, यूएईवरही हल्ले

दुबई : इस्रायलने शनिवारी रात्री तेहरानमधील तेल साठवण केंद्रावर हल्ला केला. या हल्ल्यात चार टँकर चालकांचा मृत्यू झाला. इस्रायलचा हा नागरी औद्योगिक ठिकाणावरील पहिला हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यात ईशान्य तेहरानमधील आघदस्ये तेल गोदाम, दक्षिण तेहरानमधील तेहरान रिफायनरी, पश्चिम तेहरानमधील शहरान तेल डेपो आणि करज शहरातील तेल डेपो यांना लक्ष्य करण्यात आले. इराणच्या फार्स वृत्तसंस्थेने सांगितले की, या तेलसाठवण केंद्रामध्ये स्फोट झाल्याने मोठ्या आगी लागल्या असून अनेक तास स्फोटाचे आवाज तेहरानमध्ये ऐकू येत होते. आगीच्या धुराचे मोठे लोट तेहरानच्या आकाशात दिसत होते.

हे हल्ले इतके भीषण होते की तेल साठवण केंद्रातून रस्त्यावर तेल वाहू लागले आणि या वाहणाऱ्या तेलाने पेट घेतलेला दिसत होता. इस्रायलने या हल्ल्यांचे समर्थन करताना दावा केला की, या तेल साठवण केंद्रातून इराणच्या लष्कराला तेल पुरवले जात होते.

दरम्यान रविवारी सकाळी इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर पुन्हा हल्ले चढवले. या हल्ल्यांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे लेबनॉनमधील मृतांचा आकडा ४०० च्या वर गेला आहे. इस्रायलने लेबनॉनमधील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पुढील टप्प्यात अनेक मोठ्या कारवाया होतील असे जाहीर केले.

इराणचा बहरीनमधील पाणी विलवणीकरण केंद्रावर हल्ला

रविवारी इराणच्या ड्रोन हल्ल्यात बहरीनमधील पाणी विलवणीकरण केंद्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. युद्धाला ९ दिवस होत असताना पहिल्यांदाच इराणकडून पाणी विलवणीकरण केंद्रावर हल्ले करण्यात आले आहेत. पर्शियाच्या आखातात किनाऱ्यावर शेकडो पाणी विलवणीकरण केंद्रे असून या प्रदेशातील अरब देश पिण्याच्या पाण्यासाठी या केंद्रांवर अवलंबून असतात.

इस्रायल आणि जॉर्डनवर हल्ल्याचा इराणचा दावा

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने इस्रायलमधील तेल अवीव आणि बेअरशेबा शहरांतील लष्करी लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला. तस्नीम वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आयआरजीसीने दावा केला की, जॉर्डनमधील अझराक शहरातील मुवफ्फक अल-सल्ती हवाई तळावर देखील अनेक वेळा हल्ले करण्यात आले. हा तळ अमेरिकेच्या आक्रमक लढाऊ विमानांचा सर्वात मोठा व सक्रिय तळ आहे. इराणने हे हल्ले येत्या काही तासांत व दिवसांत अधिक प्रमाणात व अधिक खोलवर होतील, असा इशारा दिला आहे.

यूएईवर १७ क्षेपणास्त्रे, ११७ ड्रोन डागले

रविवारी यूएईवर इराणने १७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ११७ ड्रोन डागले. त्यापैकी १६ क्षेपणास्त्रे आणि ११३ ड्रोन अडवण्यात आले, तर एक क्षेपणास्त्र आणि चार ड्रोन समुद्रात कोसळल्याचे मंत्रालयाने सांगितले.

युद्ध सुरू झाल्यांनतर इराणने आजपर्यंत यूएईवर २३८ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, १,४२२ ड्रोन व आठ क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेशचे नागरिक असल्याचे यूएई संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

इस्रायलमध्ये २ हजार जखमी

इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत १,९२९ लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

२२ इराणी नाविकांना रुग्णालयातून सुट्टी

कोलंबो : अमेरिकेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इराणी नौदलाच्या 'आईरिस देना' या जहाजावरच्या २२ नाविकांना रुग्णालयातून रविवारी सुटी देण्यात आली. या सैनिकांना अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत अॅम्ब्युलन्सने गालेजवळील कोग्गला येथील श्रीलंका हवाई दलाच्या केंद्रात हलवण्यात आले. गालेमधील करापितिया राष्ट्रीय रुग्णालयात अजून १० नाविकांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या आठवड्यात ५ मार्च रोजी श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ अमेरिकेच्या पाणबुडीने टॉर्पोडो हल्ल्यात इराणची 'आईरिस देना' ही युद्धनौका बुडवली होती. यात ८४ इराणी नाविक मारले गेले होते. ही नौका भारतातील विशाखापट्टणम बंदरातून परत जात असताना हा हल्ला झाला होता. या हल्ल्याची गाले शहरात न्यायालयीन चौकशी झाली. या हल्ल्यात मरण पावलेल्या ८४ मृतांपैकी ८० जणांची ओळख पटली आहे.

सर्वांकडून आंतरराष्ट्रीय कायद्याला तिलांजली

१. मॉस्को: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याने जी परिस्थिती निर्माण झाली ती पाहता सर्वांनी आंतरराष्ट्रीय कायद्याला तिलांजली दिल्याचा गंभीर आरोप रशियाने केला आहे. रशियाने युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच कायम सदस्यांची (पी-५) तातडीने शिखर परिषद बोलावण्याची मागणी केली आहे.

२. आज कोणते नियम लागू आहेत आणि त्यांचे पालन कसे करायचे, हे स्पष्टपणे सांगणे कोणालाही शक्य नाही. कारण ते नियम प्रत्यक्षात अस्तित्वात राहिलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय कायदा कागदोपत्री अजूनही अस्तित्वात आहे; मात्र प्रत्यक्ष व्यवहारात तो लागू होत नाही, असे रशियाने म्हटले आहे.

३. पुतीन यांनी कोविड-१९ रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर महासाथीच्या काळातच अशा शिखर परिषदेचा प्रस्ताव मांडला होता. त्या बैठकीत रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन या पाच देशांनी जागतिक सुरक्षा, स्थैर्य व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या भवितव्यावर सविस्तर चर्चा करावी, अशी कल्पना होती. त्यावर रशियाने या देशांच्या बैठकीची मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Oil Fields Attacked, Tehran Sky Ablaze, More Attacks Expected

Web Summary : Israel attacked Iranian oil facilities, causing massive fires. Iran retaliated, targeting Israel, Jordan, and UAE with missiles and drones. Casualties reported in Lebanon and UAE. Russia accuses US and Israel of disregarding international law.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलWarयुद्धAmericaअमेरिका