तुरुंग हे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी असतात. पण, सध्या तुरुंगात गुन्हेगारांना दारु, तंबाखू अशा गोष्टी मिळत असल्याच्या समोर आल्या आहेत. अशीतच आता एका तुरुंगात महिला अधिकारी एका गुन्हेगाराच्या प्रेमात पडल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमधील हे प्रकरण. येथे तुरुंगात ड्युटीवर असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला गुन्हेगारासोबत अश्लील फोन कॉल आणि पत्रांची देवाणघेवाण केल्याबद्दल दोषी आढळल्याचे समोर आले. या महिला अधिकाऱ्याला नोव्हेंबरमध्ये शिक्षा सुनावण्यात येणार असून पोलिसांनी तिच्या घराची झाडाझडती घेतली. पोलिसांनी गांजा आणि काही रोख रक्कम देखील जप्त सापडली.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय मेगन गिब्सन ही वेस्ट यॉर्कशायरमधील एचएम प्रिझन वेलस्टनमध्ये काम करत असताना एका गुन्हेगाराशी अनैतिक संबंधात अडकली. गिब्सनच्या मदतीने गुन्हेगाराला सी श्रेणीतील तुरुंगाच्या प्रतिबंधित भागात प्रवेश मिळाला. याशिवाय, महिलेने गुन्हेगाराला त्याच्या पुनर्वसन निवासस्थानीही भेट दिली.
९०० हून पत्रे पाठवली
गिब्सनने गुन्हेगाराच्या आईला ९०० हून अधिक संदेश पाठवले होते. महिला अधिकाऱ्याने गुन्हेगाराशी फोन सेक्स केल्याचे आरोप होते. तुरुंगात सुमारे ९०० कैदी आहेत. सरकारी वकिल लुईस रीच यांनी न्यायालयाला सांगितले आहे की, एका पत्रात गुन्हेगाराने गिब्सनचे व्हेपसाठी आभार मानले.
'दोघांमध्ये शारीरिक संबंध होते की नाही याची माहिती नाही. पत्रांमध्ये लिहिल्यानुसार यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे दिसतंय. यामध्ये अनेक पत्रांमध्ये अश्लील संभाषण आहे.
महिला अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर तिच्या घरातून काही रोख रक्कम जप्त करण्यात आली. तिला शिक्षा सुनावण्यात येणार होती, परंतु सुनावणी पुढे ढकलल्यामुळे आता तिला नोव्हेंबरमध्ये न्यायालयात हजर केले जाणार आहे.