कारमध्ये नग्नावस्थेत आढळली महिला Anchor, म्हणाली - माहीत नाही ही अवस्था कशी झाली.....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 10:44 AM2021-05-01T10:44:55+5:302021-05-01T10:48:43+5:30

या महिलेचं नाव Feven Kiflegiorgis आहे. लॉस वेगासमध्ये मॅथ्यू एवेन्यू लेनवर सकाळी ७.३० वाजता पोलिसांनी या महिला अॅंकरला अटक केली.

Female anchor found without clothes in her car police arrested US las vegas | कारमध्ये नग्नावस्थेत आढळली महिला Anchor, म्हणाली - माहीत नाही ही अवस्था कशी झाली.....

कारमध्ये नग्नावस्थेत आढळली महिला Anchor, म्हणाली - माहीत नाही ही अवस्था कशी झाली.....

Next

अमेरिकेतील लॉस वेगासमध्ये पोलिसांना एक महिला अ‍ॅंकर ला रस्त्याच्या कडेला तिच्याच कारमध्ये नग्न अवस्थेत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. या महिलेचं नाव Feven Kiflegiorgis आहे. लॉस वेगासमध्ये मॅथ्यू एवेन्यू लेनवर सकाळी ७.३० वाजता पोलिसांनी या महिला अ‍ॅंकरला अटक केली.

विना कपडे कारमध्ये आढळली महिला

द सनमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, Feven Kiflegiorgis नावाची महिला तिच्या कारमध्ये नग्नावस्थेत आढळून आली होती. Feven Kiflegiorgis ने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की, तिला आठवत नाही की, ती तिथे कशी पोहोचली. तिची अशी हालत कशी झाला. लास वेगास मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी महिलेतून दारूचा वास येत होता. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. इतकंच नाही तर महिलेने टेस्ट करण्यासाठी रक्त देण्यासही मनाई केली.

फेवेन म्हणाली की, तिने या घटनेनंतर आपलं ड्रायव्हिंग सुधारलं आहे. तिने १ हजार डॉलर म्हणजे ७४ हजार रूपयांचा दंड भरावा असा आदेश प्रशासनाने दिला आहे. दरम्यान फेवेनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला समर्थन देणाऱ्यांचे आभार मानले. ती म्हणाली की, 'तुम्ही पाहिलं असेल की, मी काही आठवड्यांपासून टीव्ही स्क्रीनपासून दूर आहे. तुम्हाला माझी चिंता वाटली, त्यासाठी खूप धन्यवाद.

फेवेनने सांगितले की, मेट्रोपॉलिटन पोलिसांनी तिला गेल्या महिन्यात अटक केली होती. त्यावेळी लास वेगासच्या रस्त्यावर पार्क कारमध्ये मी होते. दंड भरल्यावर त्यांनी मला सोडून दिलं. मात्र, ती तिथे तशा अवस्थेत कशी पोहोचली हे मात्र समोर येऊ शकलं नाही.
 

Web Title: Female anchor found without clothes in her car police arrested US las vegas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.