वेगवान गोलंदाज शोएबचा पाकिस्तानात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 20:47 IST2022-06-22T20:46:14+5:302022-06-22T20:47:10+5:30
Attempt to Suicide : फेब्रुवारी 2018 मध्ये, कराचीचा अंडर-19 क्रिकेटपटू मोहम्मद जारयाब याने शहरातील अंडर-19 संघातून वगळल्यानंतर त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

वेगवान गोलंदाज शोएबचा पाकिस्तानात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक
नवी दिल्ली : दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबाद येथील एका तरुण क्रिकेटपटूने आंतर-शहर चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) स्थानिक संघात निवड न झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. वेगवान गोलंदाज शोएबने त्याचे मनगट कापले होते आणि कुटुंबीयांनी त्याला मंगळवारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले.
कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, आंतर-शहर चॅम्पियनशिप टेस्टनंतर शोएबची संघात प्रशिक्षकाने निवड केली नाही, त्यानंतर नैराश्यामुळे त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. पुढे कुटुंबातील सदस्याने सांगितले, “आम्हाला तो आमच्या खोलीच्या बाथरूममध्ये आढळला आणि त्यावेळी त्याचे मनगट कापले होते. तो बेशुद्ध पडला होता आणि आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले जेथे त्याची प्रकृती गंभीर आहे.
फेब्रुवारी 2018 मध्ये, कराचीचा अंडर-19 क्रिकेटपटू मोहम्मद जारयाब याने शहरातील अंडर-19 संघातून वगळल्यानंतर त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.