शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest : रिहानाचं कौतुक करणारं ट्वीट थेट ट्विटरचे CEO ही 'लाईक' करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 18:59 IST

यापूर्वी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रिहाना, ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेकांनी केलं होतं ट्वीट

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाला रिहानानं दिलं होतं समर्थनरिहानाचं कौतुक करणारं ट्वीट ट्विटरच्या सीईओंनीच केलं लाईक

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. अशा परिस्थितीत २६ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळणही लागलं होतं. दरम्यान, या शेतकरी आंदोलनानं विदेशातील लोकांचं लक्षही आकर्षित करून घेतलं आहे. दोन दिवसांपूर्वी पॉप स्टार रिहानंनं आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं. त्यानंतर जगातिल अनेक सेलिब्रिटींनी या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, या एकंदरीत वातावरणात आता ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रिहानाचं कौतुक करणारी काही ट्वीट्स लाईक केली आहेत.अमेरिकेतील वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकार कॅरन यांनी नुकतंच रिहानाचं कौतुक करत काही ट्वीट्स केले होते. भारतात कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रिहानानं आवाज उठवला आहे असं म्हणत कॅरन यांनी रिहानाचं कौतुक केलं होतं. रिहानानं सूडान, नायजेरिया आणि आता भारतातील अशा अनेक आंदोलनांवर आपलं मत व्यक्त केलं आहे, असंही कॅरन यांनी एका ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.  

रिहानाचं कौतुक करण्यात आलेल्या काही ट्वीट्सना ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनीदेखील लाईक केलं आहे. यापूर्वी वॉशिंग्टन पोस्टच्या याच पत्रकारानं ट्विटरनं भारतात शेतकरी आंदोलनावर एक विशेष इमोजी तयार करण्याचं आवाहनही केलं होतं. अमेरिकेत ब्लॅक लाईफ मॅटर्सच्या वेळी असं करण्यात आलं होतं. जॅक डॉर्सी यांनी हे ट्वीटदेखील लाईक केलं आहे. रिहाना व्यतिरिक्त ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्या नातेवाईक मीना हॅरिस यांनीदेखील शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं होतं. त्यानंतर यावरून भारतात काहींनी याचा विरोध तर काहींनी याचं समर्थन केलं होतं. 

याव्यतिरिक्त भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं शेतकरी आंदोलन देशांतर्गत मुद्दा असून त्यावरील बाहेरील टिपण्णीवर आक्षेप नोंदवला होता. याव्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालयानं भारत विरोधी दुष्प्रचार सुरू असल्याचं सांगत याला विरोधा आवश्यक असल्याचं म्हटलं. तसंच कोणीही कोणत्या माहितीशिवाय यावर वक्तव्य करू नये असंही सांगण्यात आलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाच्या या वक्तव्यानंतर अनेक भारतातील अनेक सेलिब्रिटींनी भारताच्या समर्थनार्थ ट्वीट केली होती. क्रिकेटमधील काही मंडळी असतील किंवा बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी अनेकांनी भारताविरोधातील तथाकथित परदेशी दुष्प्रचाराला विरोध केला होता.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनTwitterट्विटरRihannaरिहाना