शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आता दिवस 25 तासांचा होणार...मला 24 तास पुरतच नाही म्हणणाऱ्यांनो लक्ष द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 12:27 IST

पृथ्वीच्या भोवताली असणारे अंतराळातील ग्रह,तारे किंवा चंद्र यांचा परिणाम पृथ्वीच्या परिवलनावर होत असतो.

वॉशिंग्टन- काय करु अरे मला 24 तास पुरतच नाहीत... हे हातातलं काम करणं शक्य नाही तेव्हा नवं काम कसं करणार? व्यायामासाठी एक तासही काढणं शक्य नाही असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. पृथ्वीवरचा प्रत्येक दिवस आता 25 तासांचा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ वेळ नाही म्हणून आजचं काम उद्यावर ढकलणाऱ्या लोकांना काम पूर्ण करण्यासाठी थोडा अधिक वेळ मिळणार आहे तर आळशी लोकांना आराम करायला एक तास जास्त मिळणार आहे.

सुमारे 1.4 अब्ज वर्षांपूर्वी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. पृथ्वीचे परिवलन (म्हणजे पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फिरणे) आणि चंद्र यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. चंद्र त्यावेळेस पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्यामुळे तेव्हा दिवस केवळ 18 तासांचा असायचा म्हणजे पृथ्वीला स्वतःच्या आसाभोवती फिरून एक चक्र पूर्ण करायला केवळ 18 तास पुरेसे असायचे. चंद्र जसजसा पृथ्वीपासून दूर जाऊ लागला तसा परिवलनाला वेळ जास्त लागू लागला आणि आज चंद्र ज्या अंतरावर आहे त्यावरुन पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायला 24 तास लागतात. पण संशोधकांनी आता हे लक्षात आणून दिलंय की, चंद्र पृथ्वीपासून अजूनही दूर जातंच आहे. त्यामुळे पृथ्वीच्या परिवलनाची गतीही हळूहळू मंदावत जाईल. साहजिकच परिवलानासाठी म्हणजे एका दिवसासाठी लागणारे तासही वाढतील.यासर्व अंतराळविज्ञानाच्या सांख्यिकीचं म्हणजे अशी आकडेमोड करणारं एक शास्त्र आहे त्याला अॅस्ट्रोक्रोनोलॉजी असं म्हटलं जातं. यामध्ये आपल्या सौरमालेची, पृथ्वीच्या भूगर्भीय इतिहासाची, हवामान बदलाची, अंतराळाची अशा सर्व महत्त्वाच्या बाबींचा विचार व नोंदी ठेवलेल्या असतात.

पृथ्वीच्या भोवताली असणारे अंतराळातील ग्रह,तारे किंवा चंद्र यांचा परिणाम पृथ्वीच्या परिवलनावर होत असतो. याबाबत बोलताना विस्कॉन्सिन मॉडिसन विद्यापीठातील भूगर्भविज्ञानाचे प्राध्यापक स्टीफन मायर्स म्हणाले, जसा चंद्र लांब जातो तशी पृथ्वीची रृपरिवलनाची गती मंदावते. ज्याप्रमाणे स्केटिंग करणारा स्केटर आपली गती कमी करण्यासाठी आपले हात बाहेर काढतो आणि त्याची गती कमी होते. तसेच चंद्र लांब गेल्यामुळे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती कमी होते.सध्या चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी 3.2 सेंमी इतक्या गतीने लांब जात आहे. 

टॅग्स :Earthपृथ्वीJara hatkeजरा हटकेscienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय