शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

बलुचिस्तानमधील मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट; 34 ठार, 130 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 13:51 IST

एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात एका पोलीस अधिकाऱ्यासह किमान 34 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहेत.

बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात एका पोलीस अधिकाऱ्यासह किमान 34 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहेत. तसेच जवळपास 130 जण जखमी झाले आहेत. मस्तुंगचे सहाय्यक आयुक्त (AC) अताहुल मुनीम यांनी डॉन डॉट कॉमला मृतांच्या संख्येची माहिती दिली. वृत्तानुसार, सिटी स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) मोहम्मद जावेद लेहरी यांनी सांगितले की, एक पोलीस अधिकारीही शहीद झाला आहे.

एसी मुनीम यांनी सांगितलं की, अलफलाह रोडवरील मदीना मशिदीजवळ ईद मिलादुन नबी (पीबीयूएच) जुलूससाठी लोक जमत असताना हा स्फोट झाला. त्यांनी पुष्टी केली की हा स्फोट डीएसपी गिश्कोरी यांच्या कारजवळ झाला. हा स्फोट 'आत्मघाती स्फोट' होता आणि हल्लेखोराने डीएसपी गिश्कोरी यांच्या कारजवळ स्वत:ला उडवलं अशी माहिती एसएचओ लेहरी यांनी दिली आहे.

बलुचिस्तानचे मंत्री जान अचकजई यांनी सांगितलं की, एक बचाव पथक मस्तुंगला पाठवण्यात आलं आहे. ते म्हणाले की, गंभीर जखमींना क्वेट्टा येथे हलविण्यात येत आहे. अचकजई म्हणाले, शत्रूला परकीय मदतीने बलुचिस्तानमधील धार्मिक सहिष्णुता आणि शांतता नष्ट करायची आहे, हा स्फोट असह्य आहे. कार्यवाहक मुख्यमंत्री अली मर्दन डोमकी यांनी स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांना अटक करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पीटीआयचे नेते इमरान इस्माईल यांनी या स्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केला आणि म्हटलं की, 'जे निष्पाप लोकांना मारतात ते अत्याचारी आणि दहशतवादी आहेत.' कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणा लवकरच गुन्हेगारांना पकडतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या महिन्याच्या सुरुवातीला याच जिल्ह्यात जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) नेता हाफिज हमदुल्लासह किमान 11 जण स्फोटात जखमी झाले होते. आठवडाभरापूर्वी, एका लेवी अधिकाऱ्यावर बसस्थानकावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Bombsस्फोटकेPakistanपाकिस्तान