शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 07:49 IST

Sheikh Hasina News: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. 

ढाका : गेल्या वर्षी जुलै महिन्यात सरकारविरोधात झालेल्या निदर्शनांत आंदोलकांवर केलेली कठोर कारवाई हा मानवते विरोधातील गुन्हा आहे, असा ठपका ठेवत बांगलादेशच्या परागंदा माजी पंतप्रधान शेख हसीना (७८) यांना सोमवारी बांगलादेशआंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. 

न्या. मोहम्मद गुलाम मुर्तजा मजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली न्यायपीठाने ही शिक्षा सुनावली. हसीना यांच्याबरोबर माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांना फाशीची तर माजी पोलिस महानिरीक्षक अब्दुल्ला अल मनून हे सरकारी साक्षीदार ठरल्याने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीना व कमाल यांनी भारतात आश्रय घेतला आहे. या खटल्याच्या निकालपत्राचे थेट प्रक्षेपण बांगलादेश टीव्हीवरून दाखवण्यात आले होते. निकाल वाचल्यावर काही लोकांनी न्यायालयात जल्लोष केला पण न्यायाधीशांनी त्वरित मनाई केली. 

आपल्याविरोधात दिलेला निकाल हा पक्षपाती असून ज्या न्यायाधिकरणाने हा निकाल दिला तेच बेकायदा आहे. या न्यायालयाची स्थापना कोणताही जनाधार नसलेल्या सरकारकडून झाली आहे, असा आरोप हसीना यांनी केला. कट्टरतावाद्यांना मला फाशीची शिक्षा द्यायची आहे. हे लोक निर्लज्ज आहेत, त्यांना लोकांनी निवडून दिलेला पंतप्रधान हटवायचा आहे. अवामी लीग पक्षाची राजकीय ताकद संपवण्याचा यांचा हेतू असल्याचेही हसीना म्हणाल्या. हिंमत असेल तर हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात माझ्याविरोधात खटला  लढवून दाखवावा असे आव्हान त्यांनी बांगलादेश सरकारला दिले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sheikh Hasina Sentenced to Death: Former Bangladesh PM Convicted

Web Summary : Sheikh Hasina, former Bangladesh PM, received a death sentence from a special tribunal. The court convicted her of crimes against humanity for actions during anti-government protests. Key aides also faced sentencing, while Hasina, in exile, denounced the verdict as politically motivated.
टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय