एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यानं खळबळ; व्हाइट हाउसच्या माजी वकिलाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 09:29 IST2026-02-14T09:28:52+5:302026-02-14T09:29:14+5:30

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात रुएम्लर या व्हाइट हाउसच्या मुख्य कार्यकारी सल्लागार होत्या.

Ex-White House lawyer resigns after name appears in Epstein files | एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यानं खळबळ; व्हाइट हाउसच्या माजी वकिलाचा राजीनामा

एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यानं खळबळ; व्हाइट हाउसच्या माजी वकिलाचा राजीनामा

न्यूयॉर्क - जगभर खळबळ उडवून देणाऱ्या एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्याने प्रसिद्ध गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सच्या मुख्य कार्यकारी सल्लागार व तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या व्हाइट हाउसमधील माजी वकील कॅथी रुएम्लर यांना शुक्रवारी राजीनामा द्यावा लागला. दिवंगत आर्थिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्यासोबत रुएमलर यांचे जवळचे संबंध असल्याचे ई-मेल संवादातून स्पष्ट झाले आहे. 

हे प्रकरण अंगलट आल्याने रुएम्लर यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली आहे. ई-मेलमध्ये त्यांनी एपस्टीनचा मोठा भाऊ व अंकल जेफ्री असा उल्लेख केला होता. एवढेच नाही, तर एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्यांचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न रुएम्लर यांनी केल्याचे काही वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. 

गोल्डमन सॅक्समध्ये सर्वोच्च पदावरही कार्यरत
राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी एपस्टीन फाइल्सशी आपला संबंध नसल्याचा दावा केला होता. मी एपस्टीनसोबत कोणताही ई-मेल किंवा पत्रव्यवहार केला नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात रुएम्लर या व्हाइट हाउसच्या मुख्य कार्यकारी सल्लागार होत्या. २०२० पासून त्या गोल्डमन सॅक्समध्ये सर्वोच्च कायदेपदी होत्या.

Web Title : एपस्टीन फाइल्स में नाम आने से व्हाइट हाउस के पूर्व वकील का इस्तीफा

Web Summary : एपस्टीन फाइल्स में नाम आने के बाद गोल्डमैन सैक्स की पूर्व वकील कैथी रुएमलर ने इस्तीफा दे दिया। ईमेल से जेफ्री एपस्टीन से उनके करीबी रिश्ते का खुलासा हुआ। पहले उन्होंने इनकार किया, लेकिन पत्राचार और अपराधों को कम आंकने के आरोपों के बाद इस्तीफा दे दिया।

Web Title : Epstein Files Scandal: Former White House Counsel Resigns Amid Controversy

Web Summary : Cathy Ruemmler, former White House counsel, resigned from Goldman Sachs following the release of Epstein files. Emails revealed her close ties to Jeffrey Epstein. She initially denied any connection but faced scrutiny over her correspondence and alleged attempts to downplay Epstein's crimes, leading to her resignation.