अधिकृत घोषणेपूर्वीच चीनला कोरोनाबाबतची माहिती होती; हाँगकाँगहून अमेरिकेला पळालेल्या डॉ. ली मेंग यान यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 02:52 AM2020-07-12T02:52:46+5:302020-07-12T06:30:49+5:30

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, चीनला या रोगाबाबत आधीच माहिती होती. याबाबतच्या सार्स- कोविड २ या आपल्या संशोधनाकडेही हाँगकाँगमधील आपल्या सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.

Even before the official announcement, China knew about the corona; Dr. who fled from Hong Kong to America. Information of Li Meng Yan | अधिकृत घोषणेपूर्वीच चीनला कोरोनाबाबतची माहिती होती; हाँगकाँगहून अमेरिकेला पळालेल्या डॉ. ली मेंग यान यांची माहिती

अधिकृत घोषणेपूर्वीच चीनला कोरोनाबाबतची माहिती होती; हाँगकाँगहून अमेरिकेला पळालेल्या डॉ. ली मेंग यान यांची माहिती

Next

चीनने कोरोनाची अधिकृत घोषणा केली त्यापूर्वीच त्यांना या साथीची माहिती होती. तसेच, चीन सरकारने विदेशी तज्ज्ञांना चीनमधील संपर्कासाठी नकार दिला असा दावा कोरोनावर सर्वात अगोदर अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक डॉ. ली मेंग यान यांनी केला आहे. २८ एप्रिल रोजी डॉ. यान ह्या हाँगकाँगहून अमेरिकाला पळाल्या होत्या.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, चीनला या रोगाबाबत आधीच माहिती होती. याबाबतच्या सार्स- कोविड २ या आपल्या संशोधनाकडेही हाँगकाँगमधील आपल्या सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
कोरोनाबाबतचे सत्य जगासमोर मांडण्यासाठी आपण हाँगकाँगहून अमेरिकेला आलो असे सांगताना डॉ. यान यांनी म्हटले आहे की, आपण आपले कुटुबीय मागे सोडून आलो आहोत. कारण, मला ठाउक होते की, मला तुरुंगवास होऊ शकतो. आपल्याविरुद्ध सायबर हल्ल्याचाही चीन सरकारने प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला आहे.

मर्यादेचे उल्लंघन न करण्याच्या सूचना
डॉ. यान यांनी म्हटले आहे की, हाँगकाँग विद्यापीठातील आमचे पर्यवेक्षक डॉ. लियो पून यांनी आपल्याला डिसेंबर २०१९ मध्ये सार्ससारख्या प्रकरणाचा अभ्यास करण्यास सांगितले होते. दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाच्या संभाव्य उद्रेकाचा संकेत देत आपल्या वरिष्ठांनी आपल्याला मर्यादेचे उल्लंघन न करण्याबाबत सूचित केले होते. त्यांनी असेही सांगितले की, आपण अमेरिकेत आल्यानंतर सरकारच्या एजंटांनी आपल्या अपार्टमेंटमध्ये झडती घेतली. आपल्या आई- वडिलांची चौकशी केली. हाँगकाँग विद्यापीठानेही डॉ. यान यांचे पेज अधिकृत वेबसाइटवरुन हटविले आहे आणि त्या आमच्या कर्मचारी नाहीत असे सांगितले आहे.

Web Title: Even before the official announcement, China knew about the corona; Dr. who fled from Hong Kong to America. Information of Li Meng Yan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.