शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गाझा रिकामे करा, अन्यथा...; इस्रायलचा पॅलेस्टिनी नागरिकांना इशारा, विमानातून अरबी पत्रके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 05:24 IST

इस्रायलने गाझा पट्टीवर जमिनीवर हल्ले केले तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा हिजबुल्लाहने दिला आहे.

रफाह (गाझा पट्टी) :  इस्रायलने पुन्हा उत्तर गाझामध्ये अरबी भाषेत लिहिलेली पत्रके हवेतून टाकत पॅलेस्टिनी लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला. इस्रायली लष्कराने लोकांना सांगितले की, त्यांनी हा परिसर रिकामा केला नाही, तर ते हमास या दहशतवादी संघटनेचे मानले जातील. गाझामधून आतापर्यंत सात लाख लोकांनी पलायन केले आहे. गाझामध्ये हमासने मोठ्या प्रमाणावर भूमिगत बोगदे तयार केले आहेत. जमिनीवरून हल्ले केल्यास अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. त्यामुळे वारंवार शहर खाली करण्यासाठी इस्रायलकडून सांगण्यात येत आहे.

अकाली जन्मलेल्या बाळांना धोका

जनरेटर इंधनाच्या कमतरतेमुळे कमीतकमी १३० अकाली जन्मलेल्या बाळांना ‘गंभीर धोका’ असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. उत्तर गाझामधील सात रुग्णालये वीज आणि पुरवठा नसल्यामुळे, इस्रायलच्या बंदीच्या आदेशाने बंद करण्यात आली आहेत. रुग्ण सतत येत असून अंधारात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

इस्रायलकडून दिवसरात्र हवाई हल्ले

इस्रायल- हमास युद्धाच्या १५व्या दिवशीही इस्रायली युद्धविमानांनी गाझा ओलांडून रात्रभर हवाई हल्ले केले. हल्ल्यामुळे सीरियातील अलेप्पो आणि दमास्कसच्या विमानतळांच्या धावपट्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.  वेस्ट बँकमधील एक मशिदीवरही इस्रायलकडून हवाई हल्ला करत ती नष्ट करण्यात आली.

‘आमची भूमिका महत्त्वाची’ 

इस्रायलचा हिजबुल्लाहशी सुरू असलेल्या संघर्षामुळे वेस्ट बँकमधील तणाव वाढत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आपली ‘महत्त्वाची भूमिका’ असल्याचे हिजबुल्लाहने म्हटले असून इस्रायलने गाझा पट्टीवर जमिनीवर हल्ले केले तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षGaza Attackगाझा अटॅक