हाफिज सईदची न्यायासाठी लाहोरमध्ये शरिया कोर्टाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 17:27 IST2016-04-07T17:20:03+5:302016-04-07T17:27:09+5:30
मुंबई 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि जमाद उल दावाचा म्होरक्या हाफिज सईद यानं लोकांना न्याय देण्यासाठी लाहोरमध्ये स्वतः स्शरिया कोर्ट स्थापन केलं आहे.

हाफिज सईदची न्यायासाठी लाहोरमध्ये शरिया कोर्टाची स्थापना
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. ७- मुंबई 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि जमाद उल दावाचा म्होरक्या हाफिज सईद यानं लोकांना न्याय देण्यासाठी लाहोरमध्ये स्वतः शरिया कोर्टा स्थापन केलं आहे.
पाकिस्तानच्या पंजाब कोर्टाप्रमाणे शरिया कोर्ट न्याय निवाड्याचं काम करत असल्याचं माहिती आता समोर येते आहे. जमाद उल दावानं खडमिन्स इथं शरिया कोर्टाचं मुख्यालय बनवलं आहे. जमाई क्वाडसिया, चाऊबुर्जी आणि क्वाझी हे न्यायाधीश या कोर्टात आलेल्या प्रकरणांचा न्यायनिवाड्याचं काम पाहत आहेत. दारूल क्वाझा शरिया ही खासगी न्याय संस्था असल्याचं पाकिस्तानमधल्या डॉन या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.
जलद न्याय मिळण्यासाठी जमाद उल दावानं या कोर्टाची स्थापना केली आहे. मालमत्ता आणि पैशांच्या वादातल्या तक्रारींच्या न्याय निवाड्यासाठी या कोर्टात जास्त करून लोक जात असल्याची माहिती समोर येते आहे. शरिया कोर्ट हे कायदेविषयक कोर्ट नाही, ते एका पार्टीनं स्थापलेले पंचायतीचं कोर्ट असल्याची माहिती पाकिस्तानचं प्रसिद्ध वर्तमानपत्र डॉननं दिली आहे.