बीजिंग - अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संघर्षात चीननं मोठा निर्णय घेतला आहे. चीन आता तालिबानशी थेट संपर्क साधत अफगाणिस्तानात आपलं हित साधण्यासाठी पाकिस्तानला बाजूला केले आहे. २०२१ मध्ये काबुलवर तालिबानने कब्जा केल्यानंतर चीनने पाकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तानात एन्ट्री केली होती. तालिबान राजवटीत अफगाणिस्तानात राजदूत नेमणूक करणारा चीन पहिला देश होता. चीनने अफगाणिस्तानशी व्यावसायिक संबंध मजबूत केले परंतु पाकिस्तान अफगाणिस्तानमधील चिनी हितांचे रक्षण करण्यास सक्षम नाही असं चीनला वाटत आहे. त्यामुळे चीनने तालिबानसोबत आपले संबंध नव्याने विकसित करण्यावर भर दिला असून त्यात पाकिस्तानची कुठलीही भूमिका राहणार नाही.
पाकिस्तानी हल्ल्यांमुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे चीनने अफगाणिस्तानमधील आपले सर्व प्रकल्प जवळजवळ थांबवले आहेत. इतकेच नव्हे तर चीनने या प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून परत बोलावण्यास सुरुवात केली आहे. राज्य सुरक्षा मंत्रालयासह अनेक चिनी गुप्तचर संस्थांनी, अफगाणिस्तानातील चालू प्रकल्प आणि जनसंपर्क कार्यात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावणे किंवा त्यांची अदलाबदल करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान जाणीवपूर्वक अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिक बिघडवत आहे, ज्यामुळे चिनी प्रकल्पांवर परिणाम होत आहे असा चीनला संशय आहे.
अफगाणिस्तानमधील धोरणांवर चीन पाकिस्तानवर अवलंबून
गेल्या २० वर्षांहून अधिक काळ चीन अफगाणिस्तानमधील आपली भूमिका वाढवण्यासाठी पाकिस्तानवर अवलंबून राहिला आहे. पाकिस्तानने याचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला आहे आणि आपले हितसंबंध पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर आणि तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यापासून चीनचं पाकिस्तानवरील अवलंबित्व आणखी वाढले आहे. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था, आयएसआय (ISI) यांच्या मदतीने चीनने अफगाण तालिबानच्या विविध गटांशी थेट संपर्क ठेवला होता, परंतु सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत हे शक्य नाही. त्यामुळे चीनला आता आपल्या अफगाण धोरणात पाकिस्तानपासून दूर राहणे शहाणपणाचे वाटते.
दरम्यान, २०२१ मध्ये तालिबान काबूलमध्ये परतल्यापासून चीनने अफगाणिस्तानसोबत सावध भूमिका घेतली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे अफगाणिस्तानमधील विशाल खनिजांचा वापर करणे आणि शिनजियांगसोबतची आपली पश्चिम सीमा सुरक्षित करणे. अफगाणिस्तानमधील त्याची अनुपस्थिती आणि तालिबानसोबतचे वैर यामुळे ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट (ETIM) सारख्या कट्टर अतिरेकी गटांकडून अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर होऊ शकतो अशी चीनला भीती आहे. यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था, आयएसआय (ISI) यांच्या मदतीने चीनने तालिबानसोबत मैत्रीचे संबंध वाढवले आहेत आणि ते अधिक दृढ केले आहेत. मात्र आता चीन अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानला वगळून तालिबानसोबत थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.
Web Summary : China, concerned about security and project disruptions in Afghanistan, is sidelining Pakistan. It seeks direct engagement with the Taliban to secure its interests and counter potential threats from extremist groups, especially after growing distrust towards Pakistan's role.
Web Summary : चीन, अफगानिस्तान में सुरक्षा और परियोजना में व्यवधानों से चिंतित है, पाकिस्तान को अलग कर रहा है। वह अपने हितों को सुरक्षित करने और चरमपंथी समूहों से संभावित खतरों का मुकाबला करने के लिए तालिबान के साथ सीधे संपर्क चाहता है, खासकर पाकिस्तान की भूमिका पर बढ़ते अविश्वास के बाद।