लाहोरमध्ये सरबजीतच्या मारेकऱ्याचा अंत; अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून केले ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 05:02 PM2024-04-14T17:02:20+5:302024-04-14T17:02:46+5:30

भारतीय नागरिक सरबजीत सिंगचा पाकिस्तानी तुरुंगात अंत्यत क्रुरपणे खुन करणाऱ्या अमीर सरफराजची हत्या झाली आहे.

End of Sarabjit singh's Assassin in Lahore; Shot dead by an unknown assailant | लाहोरमध्ये सरबजीतच्या मारेकऱ्याचा अंत; अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून केले ठार

लाहोरमध्ये सरबजीतच्या मारेकऱ्याचा अंत; अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून केले ठार

Pakistan News: पाकिस्तानातून मोठी माहिती समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराजची लाहोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. अमीर सरफराज हा तोच व्यक्ती आहे, ज्याने ISI च्या आदेशावरुन पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या सरबजीत सिंग यांची अत्यंत क्रुरपणे हत्या केली होती. पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात अमीर सरफराजने सरबजीतचा पॉलिथिनने गळा आवळून आणि मारहाण करुन निर्घृण खून केला होता. 

1990 मध्ये सरबजीत नकळत पाकिस्तानात पोहोचला 
सरबजीत सिंग हे भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावचे रहिवासी होते आणि याच गावात शेती करायचे. 30 ऑगस्ट 1990 रोजी ते नकळत पाकिस्तानच्या सीमेत पोहोचले. येथे त्यांना पाकिस्तानी लष्कराने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्यावर लाहोर आणि फैसलाबाद येथील बॉम्बस्फोटांचा आरोप टाकण्यात आला.

त्या बॉम्ब हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. 1991 मध्ये सरबजीत सिंग यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात सरबजीतच्या कुटुंबाने प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढली. पण, 26 एप्रिल 2013 रोजी सरबजीतवर लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात कैद्यांनी जीवघेणा हल्ला केला. अखेर 2 मे 2013 रोजी उपचारादरम्यान सरबजीतचा मृत्यू झाला.

सरबजीत सिंगच्या आयुष्यावर एक चित्रपटही बनवण्यात आला, ज्यात अभिनेता रणदीप हुडाने सरबजीतची आणि ऐश्वर्या रायने सरबजीतच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

Web Title: End of Sarabjit singh's Assassin in Lahore; Shot dead by an unknown assailant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.