तैवान लष्करप्रमुखांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 09:38 IST2020-01-02T09:37:44+5:302020-01-02T09:38:08+5:30
तैवानच्या उत्तरेकडील भागात गुरुवारी पहाटे ही घटना घडली.

तैवान लष्करप्रमुखांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; शोध सुरू
तैवानच्या लष्कर प्रमुखांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करत असताना नियंत्रण कक्षासी संपर्क तुटला आहे. यामुळे त्यांचा शोध घेतला जात असून अपघात झाल्य़ाची शक्यता वर्तविली जात आहे.
तैवानच्या उत्तरेकडील भागात गुरुवारी पहाटे ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे याच हेलिकॉप्टरमधून हवाई दल प्रमुख शेन ई मिंग सह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारीही प्रवास करत होते. या सर्वांचा शोध युद्धस्तरावर शोध घेण्यात येत आहे.