शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मालदीवमध्ये आणीबाणी, कायदा, सुव्यवस्था बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 11:40 PM

राजकीय अडचणीत सापडलेले मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सोमवारपासून देशात १५ दिवसांकरिता आणीबाणी जाहीर केली आहे.

माले - राजकीय अडचणीत सापडलेले मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सोमवारपासून देशात १५ दिवसांकरिता आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान मालदीवमधील कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती लक्षात घेता तिथे अत्यावश्यक काम नसेल तर जाणे टाळावे अशी सूचना भारत व चीनने आपापल्या नागरिकांना दिली आहे.मालदीवमधील कैदेत असलेल्या राजकीय बंद्यांची मुक्तता करावी या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास अब्दुल्ला यामीन नकार दिला. त्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी यामीन यांनी आणिबाणी जाहीर केल्याचा आरोप होत आहे. मालदीवच्या अब्दुल्ला यामीन यांच्या सरकारने रविवारी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलण्याचा प्रयत्न केल्यामुळे देश लष्करी राजवटीच्या काठावर उभा आहे. मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयातील अतिउच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालदीवने भारत आणि इतर लोकशाही देशांना मदतीसाठी विनंती केली आहे.दरम्यान, माले येथून आलेल्या वृत्तानुसार यामीन यांना सर्वोच्च न्यायालयाने राजकीय कैद्यांना सोडून देण्याचा आदेश देऊन आपल्या मर्यादांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला त्यामुळे तेथील राजकीय संकट अधिक चिघळले आहे.यामीन हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अब्दुल्ला सईद यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींना त्यांच्यावर खोटे खटले दाखल करून काढून टाकण्याच्या विचारात आहेत. न्यायालयीन प्रशासनाचे प्रमुख हासन सईद यांच्या घरावर लाचेच्या आरोपांवरून छापा घालण्यात आला आणि न्यायाधीशांना धमकावले जात आहे. मालदीवमध्ये कायद्याचे राज्य कायम राहावे यासाठी भारताने कठोर उपाययोजना करण्याची आम्हाला गरज वाटते, असे या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.

टॅग्स :newsबातम्या