शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

Twitter: ट्विटरमध्ये गळती सुरू; दोन मोठ्या अधिकाऱ्यांचा कंपनीला रामराम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 11:38 IST

Twitter: ट्विटरचे CEO पराग आग्रवाल यांनी अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला असून, नवीन भरतीदेखील थांबवली आहे.

Elon Musk Twitter: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्यांची चिंता सतावत आहे. ट्विटरच्या डीलनंतर अनेकांना कल्पना होती की त्यांची नोकरी जाऊ शकते. पण, हे इतक्या लवकर होईल, याचा कोणालाही अंदाज नव्हता.

इलॉन मस्क आणि ट्विटरसोबतचा करार पूर्ण होण्याआधीच वरिष्ठ अधिकारी कंपनीतून बाहेर पडू लागले आहेत. Twitter चे ग्राहक उत्पादनांचे महाव्यवस्थापक(कंज्यूमर प्रोडक्ट्स जनरल मॅनेजर) केव्हॉन बेकपूर(Kayvon Beykpour) आणि महसूल महाव्यवस्थापक(रेव्हेन्यू जनरल मॅनेजर) ब्रुस फाल्क(Bruce Falck)  यांनी कंपनी सोडण्याची घोषणा केली आहे.

पराग अग्रवाल यांनी मागितला राजीनामा बेकपूर यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती ट्विटरवरच दिली आहे. त्यांनी सांगितले की, 7 वर्षानंतर ते कंपनी सोडण्याचा निर्णय घेत आहेत. यासोबतच त्यांनी एक धक्कादायक खुलासाही केला आहे. बेकपूर म्हणाले की, त्यांना ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी कंपनी सोडण्यास सांगितले आहे. यावेळी त्यांनी ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांचे आभार मानले.

आता जबाबदारी कोण सांभाळणारफाल्क गेली 5 वर्षे ट्विटरशी संबंधित होते. त्यांनी ट्विटरवर कंपनी सोडल्याची माहितीही दिली आहे. फाल्कने लिहिले की, गेल्या 5 वर्षांत ज्या टीम्स आणि भागीदारांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. या प्रकारचा व्यवसाय तयार करणे आणि चालवणे हे एक सांघिक कार्य आहे. दोन्ही अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर जे सुलिव्हनचे उत्पादन आणि महसूल यांची जबाबदारी स्वीकारतील.

बाहेर काढण्याचे कारण काय?द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ट्विटरच्या सीईओने फाल्क आणि बेकपूर यांच्या राजीनाम्याची माहिती अधिकृत मेलमध्ये दिली आहे. याच मेलमध्ये अग्रवाल यांनी नोकरभरती गोठवल्याची माहितीही दिली आहे. मात्र, कंपनीचा कोणालाही नोकरीवरून काढण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कंपनीत पुढचा नंबर कोणाचा असेल याची माहिती सध्या तरी मिळालेली नाही. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांचे टार्गेट पूर्ण न केल्यामुळे काढून टाकण्यात आले आहे.

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्कParag Agrawalपराग अग्रवाल