Elon Musk vs American Government: उद्योगपती इलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादाची जगभरात चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी आणलेल्या 'बिग ब्युटिफूल'(Sweeping Budget Bill) विधेयकाला मस्क यांच्याकडून कडाडून विरोध होत आहे. दरम्यान, आता मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांचा पराभव करण्याचा इशारा दिला आहे. या विधेयकामुळे देशाची तूट $3.3 ट्रिलियनने वाढेल, असा मस्क यांचा दावा आहे.
इलॉन मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर घोषणा केली की, "सरकारी खर्च कमी करण्यासाठी मोहीम चालवणाऱ्या आणि नंतर इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जवाढीसाठी तातडीने मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याने आपली मान शरमेने झुकवावी. पुढच्या वर्षी त्यांचा पराभव नक्की करणार. हे माझे या पृथ्वीवरील शेवटचे काम असेल," असे मस्क आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.
ट्रम्प यांच्याशी संबंध पुन्हा बिघडलेकाही दिवसांपूर्वी मस्क यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याबाबतचे वक्तव्य केले होते. आज त्यांनी पुन्हा एकदा म्हटले की, हे विधेयक मंजूर झाले, तर दुसऱ्या दिवशीच अमेरिकेत नवीन पक्ष स्थापन होईल. दरम्यान, सोशल मीडियावर खासदारांना दिलेल्या या इशाऱ्यामुळे त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी सुधारत असलेले संबंध पुन्हा बिघडवून टाकले. सरकारी कार्यक्षमता विभाग किंवा डोजेमधून बाहेर पडल्यापासून मस्क सातत्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर टीका करत आहेत.
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
मस्क यांना 'वन बिग, ब्युटीफुल बिल'ची काय अडचण आहे?ट्रम्प यांच्या 'वन बिग, ब्युटीफुल बिला'चे इलॉन मस्क कट्टर विरोधक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, या विधेयकामुळे राष्ट्रीय कर्जात मोठी वाढ होईल आणि ते २.४ ट्रिलियन डॉलर्सवरून ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकते. त्यांचे म्हणणे आहे की यामुळे अर्थसंकल्पीय तूट वाढेल. तसेच, या विधेयकामुळे अमेरिकन नागरिकांवर अतिरिक्त भार वाढेल. त्यांनी या विधेयकाला हास्यास्पद आणि खूप महागडे असल्याचे वर्णन केले आहे. या विधेयकात इलेक्ट्रिक वाहन कर क्रेडिट आणि स्वच्छ ऊर्जा प्रोत्साहने काढून टाकण्याची तरतूद आहे, जी मस्क यांच्या कंपनी टेस्लासाठी घातक ठरू शकते.