शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

श्वानाच्या लोगोमुळे Elon Musk यांना मोठा झटका; अवघ्या चार दिवसांत 1.30 लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 14:53 IST

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो म्हणून Dogecoin लावल्यानंतर त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

Elon Musk Dogecoin : इलॉन मस्क यांनी नेहमीच डोगेकॉइनचे(Dogecoin) समर्थन केले आहे. जेव्हा-जेव्हा त्यांनी डॉगेकॉइनच्या समर्थनार्थ ट्विट केले, तेव्हा या क्रिप्टोकरन्सीचे नशीब उजळते. यावेळी इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या लोगोमध्ये चिमणीऐवजी Dogecoin चा कुत्रा वापरुन खळबळ उडवून दिली. आता परत त्यांनी लोगोमध्ये पक्षी आणला आहे. पण, त्यांना हा निर्णय चांगलाच महागाड पडलाय. 

Dogecoin मुळे 1.30 लाख कोटी रुपये बुडाले3 एप्रिल रोजी त्यांनी ट्विटरचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी इलॉन मस्क यांना 75 हजार कोटी रुपयांचा फटका बसला. तेव्हापासून इलॉन मस्क यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे.  3 एप्रिल ते 6 एप्रिलदरम्यान इलॉन मस्क यांनी $16 अब्ज गमावले आहेत. 3 एप्रिल रोजी मस्क यांना $ 9 अब्जांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यानंतर आतापर्यंत आणखी 7 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. भारतीय चलनात ही रक्कम 1.30 लाख कोटी होते. म्हणजेच, Dogecoin च्या कुत्र्यामुळे अवघ्या 4 दिवसांत मस्क यांना इतका फटका बसला आहे.

यावर्षी 25 टक्के वाढ झाली इलॉन मस्क यांना 6 एप्रिल रोजी $298 मिलियनचो तोटा झाला आहे, ज्यामुळे त्यांची संपत्ती 171 अब्ज डॉलर्सची आली आहे. तसेच, या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ 2023 मध्ये त्यांची एकूण संपत्ती $34.5 अब्जाने वाढली. सध्या ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट त्यांच्या पुढे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 195 अब्ज डॉलर्स आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटरTeslaटेस्लाAmericaअमेरिकाtechnologyतंत्रज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय