शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Iran Israel War: खामेनींचे अस्तित्वच मिटवा, इस्रायलचा लष्कराला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:14 IST

Iran Israel War News: इराणने इस्रायलमधील बेर्शेबा शहरातील सोरोका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ४० जण जखमी झाले.

बेर्शेबा : इराणनेइस्रायलमधील बेर्शेबा शहरातील सोरोका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ४० जण जखमी झाले; पण कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात त्या रुग्णालय इमारतीचे मोठे नुकसान झाले. तेल अवीवमधील एक गगनचुंबी इमारत व अन्य इमारतींवरही इराणने हल्ले केला. त्यामुळे संतप्त झालेले इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्राएल कात्झ यांनी सांगितले की, इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा आदेश आमच्या लष्कराला देण्यात आला आहे. दुसरीकडे, इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचा भाग असलेल्या अराक हेवी वॉटर अणुऊर्जा प्रकल्पावर देखील हल्ला केला असून त्यात किती हानी झाली हे लगेच कळू शकलेले नाही.

सोरोका रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाची जुनी इमारत इराणशी सुरू झालेल्या संघर्षानंतर रिकामी करण्यात आली होती. या रुग्णालयात सध्या फक्त प्रकृती चिंताजनक असलेल्यांवर उपचार करण्यात येत आहेत. इराणमध्ये आतापर्यंत ६३९ जण मृत्युमुखी पडले असून, त्यात २६३ नागरिकांचा समावेश आहे, तसेच १,३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

इराणची जिनिव्हा येथे आज ब्रिटन आणि फ्रान्सशी चर्चाइराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची शुक्रवारी युरोपीय देशांतील परराष्ट्र मंत्र्यासमवेत जिनिव्हा येथे बैठक घेणार आहेत. इस्रायलने सुरू केलेल्या संघर्षाबाबत इराण हा ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व युरोपियन युनियनचे प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे भूमिका मांडणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच म्हटले होते की, इस्रायल-इराणमध्ये आम्हाला केवळ शस्त्रसंधी नको आहे तर त्यापेक्षाही मोठा निर्णय होणे अपेक्षित आहे. तसेच या युद्धात अमेरिकेच्या संभाव्य सहभागाची शक्यता त्यांनी फेटाळली नाही. त्यावर इराणने इशारा दिला की, अमेरिकेने या संघर्षात हस्तक्षेप केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

लोकांना रिॲक्टर परिसर रिकामा करण्याचा इशाराइस्रायलने इराणच्या अरक हेवी वॉटर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याच्या काही तासांपूर्वी इस्रायली आर्मीने अरक आणि खोंडूब शहरांतील लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता.  अरकमधील एक हेवी वॉटर रिॲक्टर हा इराणच्या अणुकार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच अरकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे तयार केली जातात. याशिवाय, खोंडूबमध्ये एक आयआर-४० हेवी वॉटर रिॲक्टर देखील आहे, जो इराणच्या अणुकार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. हा रिॲक्टर अरकपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. अरकप्रमाणेच, त्यावर आंतरराष्ट्रीय देखरेख आहे.

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायल