अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात आठ ठार

By Admin | Updated: October 8, 2014 03:00 IST2014-10-08T03:00:02+5:302014-10-08T03:00:02+5:30

अमेरिकेने पाकिस्तानच्या उत्तर वजिरिस्तान भागात केलेल्या ड्रोन हल्ल्यात आठ ठार तर सहा जण जखमी झाले. सोमवारी हा हल्ला झाला

Eight dead in US drone attack | अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात आठ ठार

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात आठ ठार

इस्लामाबाद : अमेरिकेने पाकिस्तानच्या उत्तर वजिरिस्तान भागात केलेल्या ड्रोन हल्ल्यात आठ ठार तर सहा जण जखमी झाले. सोमवारी हा हल्ला झाला. रविवारनंतरचा हा दुसरा ड्रोन हल्ला होता. यात तालिबान कमांडर हबीब याच्या शॉल जिल्ह्यातील घराला लक्ष्य बनविले.
रविवारी दक्षिण वजिरिस्तानच्या कांड घर भागात करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांत पाच जण मारले गेले होते. २४ तासांत करण्यात आलेला हा दुसरा हल्ला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Eight dead in US drone attack