नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के, उत्तर भारतातही जमीन हादरली; सविस्तर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 20:44 IST2025-04-04T20:39:08+5:302025-04-04T20:44:50+5:30

उत्तरेकडील राज्यात आज भूकंपाचे धक्के जाणवले. ५.० रिश्टर स्केल एवढी तीव्रता होती.

Earthquake tremors in Nepal, tremors felt in North India too Know the details | नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के, उत्तर भारतातही जमीन हादरली; सविस्तर जाणून घ्या

नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के, उत्तर भारतातही जमीन हादरली; सविस्तर जाणून घ्या

नेपाळमध्ये आज ५.० रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे सौम्य धक्के उत्तर भारतातील अनेक भागातही जाणवले. भारतीय वेळेनुसार, हा भूकंप संध्याकाळी ७.५२ वाजता जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, भूकंपाची खोली जमिनीपासून २० किलोमीटर खाली होती.

काही दिवसांपूर्वी म्यानमार आणि थायलंडमध्ये ७.७ तीव्रतेचा तीव्र भूकंप झाला होता. या भूकंपाने तेथील अनेक भाग हादरले.या भूकंपाने मोठं नुकसान झालं आहे. म्यानमारमध्ये आतापर्यंत २,७१९ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४,५२१ लोक जखमी झाले आहेत आणि ४४१ लोक बेपत्ता आहेत.

'जीव देऊ, पण दुरुस्ती मान्य करणार नाही', वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना रस्त्यावर

दक्षिण आशियातील टेक्टोनिक प्लेट्सच्या वाढत्या हालचालीचे लक्षण आहे, यामुळे भविष्यात अधिक मोठे भूकंप होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. नेपाळ आणि म्यानमार सारखे हिमालयीन आणि सुदूर पूर्वेकडील भाग आधीच असुरक्षित क्षेत्र मानले जात आहेत.

Web Title: Earthquake tremors in Nepal, tremors felt in North India too Know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.