अफगाणिस्तानात आज सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंपअफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेजवळ अगदी जवळ जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ही माहिती दिली आहे.
अफगाणिस्तानमध्ये आज (१९ मे) सकाळी ०८. ५४ वाजता भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.२ इतकी मोजली. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात होते, हे पाकिस्तानच्या सीमेजवळ जवळ होते.
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
चार दिवसांत चौथा धक्का
भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १४० किलोमीटर खाली होते. गेल्या ४ दिवसांत हा चौथा भूकंप आहे. प्रत्यक्षात अफगाणिस्तान भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्समधील फॉल्ट लाइनवर आहे. भारतीय प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली जाते तेव्हा हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवतात.
मागील गुरुवारी चीन आणि तुर्कीमध्ये भूकंप
गुरुवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्यामुळे चीनची जमीन थरथरली आहे. चीनला आज भूकंपाचे धक्के बसले आहेत. एवढेच नाही तर गुरुवारी सायंकाळी तुर्कीला देखील भूकंपाचे हादरे बसले आहेत.
पहाटे साडे तीनच्या सुमारास आलेल्या चीनमधील भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. तर तुर्कीला बसलेला धक्का हा थोडा मोठा होता. तुर्कीला 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. चीनमधील भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १० किमीवर होते, असे सांगण्यात आले आहे.